Home विदर्भ झाडगांवच्या जि.प.शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

झाडगांवच्या जि.प.शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

139

बाबाराव इंगोले – झाडगांव

धामणगांव रेल्वे , दि. ०९ :- तालुक्यातील झाडगांवच्या जिल्हा परीषद माध्यमिक शाळेत परीसरातील गांवातील विद्यार्थी ह्या शाळेत शिक्षण घेत आहे.परंतू शाळेला चालू सञा पासूनच शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ह्या गंभीर समस्येकडे माञ लोकप्रतिनिधी व संबंधीत शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जाणीव पुर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.
झाडगांव येथील जिल्हा परीषद माध्यमिक शाळेला सुशोभीत अशी सुंदर नव्यानेच बांधकाम करण्यात आलेली भव्य इमारत आहे.या ठिकाणी वर्ग आठ ते दहावी पंर्यत शिक्षण आहे.ह्या शाळेत परीसरातील गांवातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेण्याकरीता येत आहे.पंरतू शिक्षकांच्या अभावामूळे शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट निर्माण होत आहे.ह्या गंभीर समस्ये कडे संबंधीत शिक्षणाधिकारी, लोक प्रतिनिधी व ग्राम पंचायतचे पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीत पणामुळे ह्या शाळेला विद्यार्थ्यांच्या संख्येला ग्रहण लागले असल्याचे चिञ निर्माण झाले आहे.ह्या समस्येकडे जातीने लक्ष देवून शाळेतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दखल संबंधीत शिक्षणाधिकारी व लोक प्रतिनिधी,ग्राम पंचायतचे पदाधिकारी यांनी घ्यावी व विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळून रिक्त असलेल्या शिक्षक व सहाय्यक लिपीकांची त्वरीत नेमणूक करुन विद्यार्थ्यांच्या भविष्य घडविण्याचे काम करावे.