शरीफ शेख
रावेर , दि. ०९ :- पर्यावरण संवर्धन व संरक्षण हे काळाची गरज असून हे पुढच्या पिढीत रुजवणे अत्यंत महत्त्वाची गरज होय ह्या दृष्टिकोनाने किड्स गॅलेक्सी इंग्लिश स्कूल रावेर या शाळेतील प्री-प्रायमरी विद्यार्थ्यांची सहल पाल येथील नैसर्गिक पर्यटन स्थळावर पोहोचली लहान लहान चिमुकल्यांनी हसत-खेळत शिक्षणाचे हेतूने बाल विधानाच्या खूप सैर सपाटा व फेरफटका मारला विद्यार्थ्यांनी अनेक खेळ ही खेडले व रस्सी खेच व मॅरेथॉन यासारखे अनेक स्पर्धा ही घेण्यात आली.
विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी पाण्याचे मुख्य स्रोत हे नदी होय याची जाणीव विद्यार्थ्यांना देण्यात आली वेगवेगळे झाडे फुले व पाने यांच्यातील फरक समजून दिला निसर्गाचे निरीक्षण व पर्यावरणाची आवड आयुष्याचे अत्यंत जवळचे नाते होय व नैसर्गिक साधन संपत्ती ची आवड व जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना यांचे महत्त्व पटवून दिले.
ए हॉट झूलता पुल , नदी , प्राणी, व बारसिंग या इत्यादी ठिकाणी भेट देऊन विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने सहलीचा आनंद घेतला.
या दरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक भाज्यांच्या आस्वाद घेतला व एकमेकांचे डब्बे देवाण-घेवाण करून आपली मैत्रिणीचे हक्क अदा केले इतकच नव्हे तर शेवटी ” गोड असावे जेवण शेवटच्या घासी” असे घोषवाक्य म्हणतं म्हणतं एक-मेकांना गुलाब जामुन खायला दिले व एकमेकांच्या तोंड गोड केले.
या सहलीला यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे शिक्षक व शिक्षिका माननीय सना खान , रिजवाना खान , शाजिया मिस , अर्शिन मॅडम , नदीम मोमिन सर आणि शाळेचे मुख्याध्यापक माननीय रेहान मोमीन सर यांनी आपले अमूल्य सहकार्य दिले.