Home जळगाव उपक्रमशील शिक्षक प्रमोद पाटील चिलाणेकर यांची मुख्याध्यापकपदी निवड म्हणजे विदयार्थांची गुणवत्ता वाढीसाठी...

उपक्रमशील शिक्षक प्रमोद पाटील चिलाणेकर यांची मुख्याध्यापकपदी निवड म्हणजे विदयार्थांची गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी –  पत्रकार नुरूउद्दीन मुल्लाजी

373

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील कासोदा ता. एरंडोल येथील सामाजिक शैक्षणिक सहकार पत्रकारिता साहित्य क्षेत्रातील सर्व परिचित व्यक्तीमत्व श्री प्रमोद पाटील चिलाणेकर ( भैय्यासाहेब ) यांची तालुक्यातील नामंकित असलेल्या आडगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित धनराज खंडेराव पाटील माध्यमिक विद्यालय च्या मुख्याध्यापक पदी आडगाव शिक्षण प्रसारक मडळाचे अध्यक्ष बापूसाहेब शालीग्राम श्रीपत पाटील व त्यांचे संचालक मंडळ शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बांधवांनी सर्वानुमंते निवड केली शाळेचा व विदयार्थांचा ज्ञानाचा व शिस्तीचा विकास होण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार महासंघाचे तालुकाध्यक्ष नुरूउद्दीन मुल्लाजी यांनी आपले मत पत्रकातुन व्यक्त व्यक्त केले प्रमोद पाटील चिलाणेकर यांचे कार्य कासोदा आडगाव व जळगाव जिल्हयाला परिचित आहे ते राष्ट्रीय मानवधिकार व सामाजिक न्याय संघटन जिल्हाध्यक्ष भारतीय पत्रकार संघाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष एरंडोल तालुका टि डि एफचे अध्यक्ष मराठी अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष कै आबासाहेब खंडेराव श्रीपत पाटील सहकारी फुटसेल सहकारी संस्थेचे संचालक एरंडोल व धरणगाव तालुका माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालक आडगाव शिक्षण प्रसारक मंडळ संचालक लोकमतचे पत्रकार अश्या विविध संस्थेवर यशस्वी कामगिरी करीत आहे या माध्यमातून त्यांना अनेक छोटे मोठे पुरस्कार प्राप्त झाले आहे अश्या बहुआयामी व्यक्तीमत्वाची मुख्याध्यापक पदी निवड झाल्याने कासोदा व परिसरातील हिंदू मुस्लीम बांधवांनी अभिनदन केले.