Home मराठवाडा भगवानबाबांच्या पालखीचे बिडकीनमध्ये जल्लोषात स्वागत

भगवानबाबांच्या पालखीचे बिडकीनमध्ये जल्लोषात स्वागत

154

रवि गायकवाड

बिडकान , दि. १० :- ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रभरातून भक्तगण पालख्या आणि दिंड्या घेऊन दरवर्षी भगवानगडावर येत असतात त्या अनुषंगाने दि ११ जानेवारी रोजी येत असलेल्या पुण्यतिथीनिमित्त जयभगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप हे गेल्या वर्षीपासून औरंगाबाद ते भगवानगड पायी पालखी सोहळा आयोजीत करतात दि ७ जानेवारी राञी बिडकीन नगरीत पालखीचे आगमन झाले या प्रसंगी पालखीचे स्वागत करुन बाबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बिडकीनचे संरपच मनोज पेरे , अमोल वंजारे, विकास गोर्डे, अरविंद काळे , शुभम केद्रे, राज केंद्रे, अरूण शिंदे, आर्या वंजारे ,मुसळे साहेब ,आदिनाथ बडे ,फुंदे सर, आंधळे सर , घुगे साहेब , प्रफुल्ल चौधरी ,तसेच राजे संभाजी क्रिडा मंडळाचे सदस्य व बाबांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सावता मंगलकार्यालच्या वतीने अतिशय सुंदर अशी भोजनव्यवस्था व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली सकाळी 8 वाजता साईमंदिरात डॉ राज केंद्रे यांच्यामार्फत नाष्टा , चहापाणी करून मनोभावे पालखीला निरोप देण्यात आला.