Home विदर्भ ग्रामीण परिसरात जागतिक साक्षरता दिन साजरा.!

ग्रामीण परिसरात जागतिक साक्षरता दिन साजरा.!

181

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – जिल्ह्यातील माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या वाचन संस्कृती चळवळ च्या कार्यकर्त्यांच्या वतीने देवळी परिसरातील झोपडी-पाल मध्ये राहणाऱ्या, जडीबुटी विक्रीवर आवली उपजीविका भागवणाऱ्या जागा मिळेल तिथे भटकंती करणाऱ्या कुटुंबातील मुलांना एक वही,पेन व पुस्तक वाटप करून साक्षरता दिन साजरा करण्यात आला. भटक्या जमातीतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे म्हणून माध्यम साक्षरता संस्था वाचन संस्कृती चळवळ चालवते. या चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थी ज्ञानार्थी झाले पाहिजे, पुस्तकासोबत आजच्या युवा पिढीने मैत्री केली पाहिजे, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, चांगले शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे तो त्यांना मिळाला पाहिजे म्हणून संस्था पातळीवर सातत्याने कार्य सुरू आहे. जागतिक साक्षरता दिनी आजचे जगातील साक्षरतेचे प्रमाण लक्षात घेता जगात एकीकडे डिजिटल पद्धतीने शिक्षण घेतल्या जाते आणि एकीकडे साधे पुस्तके सुध्दा मुलांना वाचण्यास उपलब्ध नाहीत. ही शैक्षणिक विषमता आपल्या समाजासाठी बरी नव्हे अशी टिप्पणी करीत एक पुस्तक पेन वही विद्यार्थ्यांना वाटप करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले, व पालकांचे समुपदेशन करण्यात आले. या प्रसंगी संस्थापक विजय पचारे, संस्थेचे कार्यक्रम समन्वयक हनुमंत पचारे व स्नेहा पचारे यांचे हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ व वही पेन पुस्तके वाटप करण्यात आले.