Home सातारा मायणीत उभारलेले ऑक्सिजन सेंटर खरोखरच कौतुकास्पद – प्रांत अश्विनी जिरंगे

मायणीत उभारलेले ऑक्सिजन सेंटर खरोखरच कौतुकास्पद – प्रांत अश्विनी जिरंगे

158

कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करणे गरजेचे अशा दानशूर व्यक्तीचे कौतुक प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे 

सतीश डोंगरे

मायणी / सातारा –  मातोश्री सरुताई चॅरिटेबल ट्रस्ट , यशश्री महिला बचत गट , मायणी मेडिकल असोसिएशन आणि डॉ दिलीपराव येळगावकर मित्रमंडळ यांच्या वतीने मायणीत ऑक्सीजन सेंटरची सोय,कोरोना चे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे आत्तापर्यंत देशात लाखो लोक मरण पावले आहेत त्या संकटाला समोर जाण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली पाहिजे असे आवाहन माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे मॅडम यांनी मायणी येथील ऑक्सिजन बेड लोकार्पण सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलताना केले याप्रसंगी तहसीलदार अर्चना पाटील, मा.आ.डॉ. दिलीपराव येळगावकर, युवा नेते सचिनभाऊ गुदगे, पोलीस निरीक्षक मालोजीराजे देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी उपसरपंच आनंदा शेवाळे,ट्रस्टचे उपाध्यक्ष ग्रा.पं सदस्य विजय कवडे, सचिव रवींद्र बाबर,मायणी मेडीकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर्स यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रांत अधिकारी पुढे म्हणाल्या की येथून पुढचे नियोजन कसे करायचे हा गंभीर प्रश्न आहे अनेक संस्थेकडून सेंटर उभा राहत आहेत पण डॉक्टर कमी पडत आहेत खाजगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिकमध्ये कॉलसेंटर सुरू केल्यास त्या सर्व प्रकारे शासन मदत करेल तसेच केवळ ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून प्राण जाऊ नये यासाठी हे उभारलेले ऑक्सिजन सेंटर खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील मेडिकल असोसिएशनने केलेले कार्य कौतुकास्पद आहे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील तुरूकमाने व तलाठी शंकर चाटे व पोलीस पाटील यांनी रात्रंदिवस केलेल्या कामाचे कौतुक अधिकाऱ्यांनी केले आहे मा.आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की सर्वसामान्य गरीब कार्यकर्ता हीच माझी दौलत आहे त्यांच्या जीवावर मी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत सर्वसामान्याचे प्राणऑक्सिजन अभावी जाऊ नयेत म्हणून हा उपक्रम घेतला आहे हा उपक्रम येथून पुढे प्राथमिक आरोग्य केंद्र मायणी येथे सुरू राहील अशी ग्वाही दिली या साठी आजुन काही निधी उपलब्ध करून दिला जाईल व याचा लाभ मायणी व मायणी परीसरातील 15,ते20 गावाना याचा लाभ मीळावा अशी सुचना डॉ. तुरुकमाने यांना मा.आ.दिलीपराव येळगावकर यांनी दिली व या सेंटर साठी मा.आ.प्रभाकर घार्गे,मा.नंदकुमार मोरे पं.स.सदस्या मेघाताई पुकळे.मा.जगदीश कदम, मा.इं.ढाळे या मान्यवरांनी आँक्सीजन मशीन अशा सामाजिक उपक्रमास दानशूर लोकांची मदत होत आहे .तहसीलदार अर्चना पाटील यांनी सांगितले की शासनाने सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत पडळ गुरसाळे येथील नवीन पूर्ण सेंटर सुरू करीत आहोत खटाव येथे 125 बीडचे औध ते 50 वेळचे सेंटर सुरू केले आहे कलेढोण येथे सेंटर सुरू करण्यास काही अडचणी आहेत असे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले सरपंच युवा नेते सचिन गुदगे यांनी मायणीत कोरोना बाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन येथील कर्मचारी मेडिकल कॉलेज वर काम करतात व मायणीतील लोकांना साठी बेड आरक्षित करावे याची मागणी केली . या प्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली व समस्या मांडल्या या कार्यक्रमास माजी उपसरपंच सुरज पाटील ,पोलीस पाटील प्रशांत कोळी, सौ उर्मिला येळगावकर ,ग्रामपंचायत सदस्य विजय देशमुख ,जगन्नाथ भिसे, नितीन झोडगे,डॉ. मकरंद तोरो.डॉ. विकास देशमुख डॉ.सूर्यकांत कुंभार,डॉ. तांबवेकर, डॉ. अमोल चोथे ,डॉ. उदय माळी, व सर्व पत्रकार, व यशश्री महिला बचत गटाचे प्रमुख महिला कार्यकर्ते उपस्थित होते सुत्रसंचालन राज संस्थेचे अध्यक्ष राजाराम कचरे यांनी केले शेवटी डॉक्टर तुरकमाने यांनी आभार मानले.