Home सोलापुर शिरवळ येथे आज आ.सचिन कल्याशट्टी यांचा भव्य नागरिसत्कार

शिरवळ येथे आज आ.सचिन कल्याशट्टी यांचा भव्य नागरिसत्कार

211

वागदरी – नागप्पा आष्टगी
अक्कलकोट , दि. ११ :- अक्कलकोट विधानसभा मतदार संघातुन ऐतिहासिक विजय मिळविल्याबध्दल शिरवळ येथील अप्पु बिराजदार मित्र परिवाराच्या वतीने भव्य नागरिसत्कार करण्यात येणार असल्याचे माहिती भाजप नेते अप्पासाहेब बिराजदार यांनी दिली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथील ग्रा .प कार्यालयासमोर होणा-या या सत्कार समारंभास माजी आ.सिद्रामप्पा पाटील .शिक्षण व आरोग्य सभापती शिवानंद पाटील ,नगरसेवक यशवंत घोंगडे ,आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.या वेळी १० वी परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे व पत्रकारांचे सत्कार होणार आहे.वागदरी ग्रा प सदस्य सुनिल सावंत यांची अक्कलकोट तालुुक मराठा सेवा संघावर निवड झाल्याबध्दल विशेष सत्कार होणार आहे.तरी बहुसंख्य नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन अप्पु बिराजदार यांनी केले आहे.