Home सातारा पेरूची चव झाली कोरोनामुळे कडू संततधार पाऊस व ग्राहक नसल्याने बागायतदार हतबल…!

पेरूची चव झाली कोरोनामुळे कडू संततधार पाऊस व ग्राहक नसल्याने बागायतदार हतबल…!

156

सतीश डोंगरे 

मायणी / सातारा –  वातावरण बदलाने पावसाने वाढवलेला आपला मुक्काम व देशात दिल्ली ते गल्ली धुमाकूळ घालत असलेला कोरोना ,याचा थेट बाजारपेठेवर व जनसामन्यावर झालेल्या परिणामामुळे ग्राहक उपलब्ध न झाल्याने मायणीच्या प्रसिद्ध पेरूची चव कडू झाली असून काबाडकष्ट करून जोपासलेल्या बागा गळून जाऊ लागल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे.
मायणी हे गाव राजकारणा,धार्मिक ,शैक्षणिक व पक्षी आश्रयस्थानासाठी सर्वदूर प्रसिद्ध आहे. परंतु या सर्वांसोबतच मायणीला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवुन दिली ती मायणीच्या पेरूनें. या प्रसिद्धीमुळे पेरूला रत्नागिरी, मालवण, कोल्हापुर, सातारा, सांगली, सोलापूर यांसारख्या अनेक मोठ्या बाजार पेठा सहज उपलब्ध झाल्या आहेत . गावातील अनेक बेरोजगार युवकांना व्यापारउद्योग संधी होत असते. आजच्या या कोरोना संकटाच्या काळात या पेरूला बाजारपेठ उपलब्ध होत नाही या बरोबरच बाजारात मागणी कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेरूचे नुकसान होत आहे. खरेदी केलेली मुद्दल ही आज विक्रीतून लोकांच्या हातात मिळणे शक्य होत नाही. पावसाची सातत्याने होणारी रिपरिप यासह विक्री अभावी पेरू बागेतच गळून पडत आहेत .
दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळवणारा बागायतदार यंदा कोरोनामुळे बाग जपण्यासाठी गेलेला कीटकनाशके , खते, प्रवासखर्च ,रोजगाराचे पगार हा मेहनत केलेला खर्चही मिळून शकत नाही. हातातोंडाशी आलेली फळांनी भरलेली बाग डोळ्यांदेखत गळून जाताना पाहून शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक असा दोन्ही प्रकारचा त्रास होतो आहे. शासनाने याची दखल घेऊन त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे .

चौकट –
२०१९ (शेतकऱ्यांना मिळणारा व्यापारी दर)
प्रति २० किलो कॅरेट – अंदाजे ५०० ते ६०० रुपये , २०२०
प्रति २० किलो कॅरेट -अंदाजे ५० ते १५० रुपये

( आपापल्या भागातील पेरू उत्पादकांची प्रतिक्रिया लावणे गरजेचे )