नांदेड , (बालाजी सिलमवार) – दिनांक – २४ नांदेड बरबडा येथील रहिवासी श्री दिगंबर तुकाराम पपुलवाड व सौ जयश्री पपुलवाड हे दांप्यत्य नौकरी निमित्त सातारा जिल्हातील पाटण तालुक्यामध्ये शासकीय नौकरी करीत आहेत कु श्रेयसी चे वडील जिल्हा परिषद शाळा शिंदेवाडी येथे तर आई जयश्री पपुलवाड ह्या पाटण येथील पोस्ट ऑफिस मध्ये पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत आहेत यांची बारा वर्षाची मुलगी कुमारी श्रेयसी पपुलवाड ही गेल्या महिन्यात दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पाटण येथील घरी आपल्या छोट्या बहिणी सोबत गॅलरीत खेळत असताना अचानक पाऊस सुरू झाला तेव्हा ती पडणाऱ्या पावसाच्या थेंब आपल्या हातावर घेवून पाण्यासोबत खेळत असताना श्रेयाची चौथ्या मजल्यावरून तोल जावून सरळ खाली जमिनीवर पडली.
तेव्हा तात्काळ पाटण येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले तेव्हा श्रेया च्या हात पाय मेंदू सह डोळ्याला जबर मार लागल्यामुळे कुमारी श्रेयास पुढील उपचाराकरिता पुणे येथील सहयाद्री डेक्कन हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आली तेव्हा पासून ती डॉक्टरांच्या उपचारासाठी बऱ्यापैकी प्रतिसाद देत होती व तशी तब्येतीमध्ये सुधारणा होवु लागली परंतु आज 24 सप्टेंबर रोजी दुपारी अचानक तिला तीव्र झटका आल्याचे ह्या चिमुकलीचा प्राणज्योत मावळली.या चिमुकलीचा अंत्यविधी उद्या दिनांक २५ सप्टेंबर रोजी त्याच्या राहत्या गावी बरबडा ता नायगाव जिल्हा नांदेड येथे सकाळी 10 वाजता सोशल डीस्टसिंगच्या सर्व नियमाचे पालन करून अंत्यसंस्कार होईल.श्रेया ही अतिशय हुशार, गुणी,होती ती पहिली पासून तर सहावी पर्यंत वर्गात सर्व विषयात अव्वल नंबर वर असायची.ती माहूर तालुक्यातील मदनापुर येथील रामय्या कोगुरवार यांची नात व प्राध्यापक नरेंद्र कोगुरवार आरोग्य विभागातील संजय कोगुरबार यांची भाची व बरबडा येथील गोविंद पपुलवाड यांची पुतणी होय. चिमुकली श्रेयाच्या इमारतीच्या गॅलरीतून पडून अपघाती निधन झाल्यामुळे मन सुन्न व हेलावून टाकणारी घटना घडली असून या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.