सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
रोडवरील धाम कॅन ल मध्ये अग्यात चोरट्यांनी फेकली एटीएम चे पार्ट…!
वर्धा , दि. ११ :- जिल्ह्यातील सेलू येथील गुरुवारचे मध्यरात्री तीनच्या सुमारास को-ऑपरेटिव सहकारी बँक समोरील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सहित सहा लाख ९४ हजार रुपये घेऊन चोरटे पसार झा ले, ही घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी कसून तपास चालू केला,
चोरट्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र एटीएम त्यामध्ये सहा लाख ९४ हजार रुपये सहित पूर्ण एटीएमच चार चाकी गाडी मध्ये टाकून नेऊन सेलू ते रे हकी सुरगाव महाकाळ येळाकेळी मार्गे जाताना महाकाळ गावा जवळील धाम नदीचे कॅनल मध्ये संपूर्ण पैसे काढून खाली एटीएम चे पार्ट फेकून दिले, तसेच काही पार्ट बाहेर असल्यामुळे गावातील लोकांनी भंगार आहे म्हणून उचलून ने ले, पोलिसांनी ते पार्ट सुद्धा पंचनामा करीत तसेच पाण्यातील तसेच बाहेरील पूर्ण पार्ट जप्ती मध्ये घेतले आहे,
मागील पंधरवड्यात सेवाग्राम येथील एटीएम सुद्धा ढगा येथील जंगलामध्ये तोडण्यात आले होते, तसेच सेलू तिल बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम सुद्धा सेलू रेहकी, सुरगाव, येळाकेळी, खरांगणा, ढगा, बांगडा पूर, कन्नमवार ग्राम मार्गे नागपूर अमरावती हायवे कडे अज्ञात चोरट्यांनी पळ काढल्याचे पोलीस सूत्रांकडून माहिती आहे, त्याच मार्गाने हे पण एटीएम गेल्याचे पोलिसांनी सांगितले.