Home सातारा पत्रकार दै.ललकारचे राजेश जाधव यांना “राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार” जाहीर

पत्रकार दै.ललकारचे राजेश जाधव यांना “राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार” जाहीर

188

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांचेवतीने होणार पुरस्काराचे वितरण

मायणी / सातारा – विटा ता.खानापूर जि.सांगली शहरासह परिसरात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असलेले श्री साईनाथ फाऊंडेशन’च्या माध्यमातून गेली तीन वर्ष सातत्याने सामाजिक उपक्रम करून सर्वसामान्य लोकांसाठी अविरतपणे काम करणारे वीस वर्षांचा प्रदीर्घ आता पत्रकारितेला अनुभव असणारे राजेश दत्तात्रय जाधव यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नुकताच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांचेवतीने 21वे राज्यस्तरीय गुणगौरव महासंमेलन 2020 राज्यस्तरीय पुरस्कार वितरण महासोहळा कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2020 जाहीर करण्यात आला आहे.

राजेश जाधव यांनी विविध वृत्तपत्रातून लेखन करत विविध विषयांवर मार्मिक विश्लेषण केले आहे वडिलोपार्जित पत्रकारितेचा वसा आणि वारसा गेली वीस वर्षे ते सातत्याने टिकवून ठेवत आहेत श्री साईनाथ फौंडेशनच्या माध्यमातून वृक्ष लागवड स्वच्छ भारत अभियान जलसंधारण त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती दुष्काळ महापूर अशा संकटात देखील फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांना मदत केली आहे. कोरोना संकटात विटा परिसरामध्ये राजेश जाधव यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून व पत्रकारितेतून उल्लेखनीय कार्य केले आहे. राजेश जाधव यांनी विटा परिसर खानापूर तालुका तसेच सांगली जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे निर्वेड निपक्षपातीपणे व अभ्यासूपणे आपली पत्रकारिता त्यांनी जोपासली आहे.
त्यांच्या याच सामाजिक कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ट्रस्ट मुंबई यांनी राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार 2020 जाहीर केला आहे या निमित्ताने त्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.