श्रीवर्धन तहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन….!
उदय वि कळस – श्रीवर्धन
उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या किळसवाण्या प्रकरणामुळे देशभरात सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्या अनुषंगाने शेकापचे माजी आमदार पंडीत पाटिल यांच्यावतीने सोमवार दि. १२ आॕक्टोबर रोजी श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी यांना या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी आपली संतप्त मागणी मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळातील काही नुकसानग्रस्त शेतकरी,घर व दुकानदार आजही चार महीने उलटुन गेले तरी शासनाच्या मदतीपासुन वंचीत आहेत तसेच मदत वाटपात काही विभागाला झुकते माप देण्यात आले आहे तर काही विभागाला कमी मदत मिळात आहे का ? त्याचबरोबर निसर्ग वादळाचे दहा किलो गहू व दहा किलो तांदूळ शासन निर्णय निघूनही वाटप झाले नाही या बाबत चर्चा करण्यात आली तहसीलदार यांनी सर्व प्रश्नांचे निरसन करुन हाथरस प्रकरणाबाबत आपल्या असणाऱ्या तिव्र भावना शासनापर्यंत पोहचवु असे आश्वासन दिले.यावेळी शेकापचे श्रीवर्धन तालुका चिटणीस वसंत यादव तसेच विश्वास तोडणकर, अमित पाटील स्वप्निल बिराडी, सौ.सूचिता पुसाळकर चिरणकर, सनगे,प्रमोद नाक्ती आदि शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.