नवी दिल्ली , दि. १६ :- उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग (DPIIT) ला केंद्र सरकारने सरकार मान्य पद्धतीने डिजीटल माध्यमांचा वापर करुन चालू घडामोडी आणि बातम्या प्रसारीत करण्यासाठी 26% थेट परकीय गुंतवणूकीला मंजूरी दिली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय नजीकच्या भविष्यकाळात पारंपरिक माध्यमे (मुद्रीत आणि दूरचित्रवाहिनी) यांना असलेल्या पुढील सुविधा डिजीटल माध्यमांना देण्याचा विचार करत आहे.
- पत्रकार, कॅमेरामन, व्हिडीओग्राफर्स यांना पीआयबी अधीस्वीकृती दिली जाईल, या माध्यमातून त्यांना तात्काळ माहिती आणि अधिकृत पत्रकरापरिषदा आणि इतर संवादांना प्रवेश मिळेल.
- पीआयबी अधीस्वीकृती धारकांना सीजीएचएस लाभ आणि सवलतीच्या दरात प्रवास सुविधा विद्यमान प्रक्रियेनुसार मिळते.
- ब्युरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन यांच्याकडील जाहिरातीसाठी पात्रता
मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील स्वयं-नियमन करणार्या संस्थांप्रमाणेच, डिजिटल माध्यमांमधील संस्था त्यांचे स्वारस्य आणि सरकारशी संवाद साधण्यासाठी स्वयं-नियमन संस्था तयार करू शकतात