Home सोलापुर सांगवी प्रशालेच्या च्या विद्यार्थ्यांनी अनुभवली विलक्षण सहल

सांगवी प्रशालेच्या च्या विद्यार्थ्यांनी अनुभवली विलक्षण सहल

163

सतीश मनगुळे

अक्कलकोट , दि. १३ :- तालुक्यातील सांगवी बु फत्तेसिह शिक्षण संस्था संचलित सांगवी बु प्रशाला च्या विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी अभ्यास न देता या धावपळीच्या दुनियेत सहलीच्या माध्यमातून एक विरंगुळा अनुभवयास मिळावा या उद्देशाने सांगवी बु प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांना तीन दिवसीय सहल आयोजित केली होती. त्या सहली दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रेक्षणीय स्थळे व निसर्गरम्य आणि आधुनिक प्रकल्पास क्षेत्रभेट म्हणून भेट देत वनभोजनाचा आस्वाद घेतला. याप्रसंगी मुलांना मोकळ्या आभाळाखाली बागडणे, खेळणे व बस मनसोक्तपणे गीत गाणे सहलीचा आनंद हा जगा वेगळा असतो ते प्रस्तुत शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला. कोल्हापूर ते अक्कलकोट प्रवासा दरम्यान अनेक प्रेक्षणीय स्थळ पहावयास मिळत असल्याने त्या-त्या ठिकाणी फोटो व्हिडीओ शूटिंग करण्याचा मोह विद्यार्थ्यां समवेत शिक्षकांना देखील आवरत आला नाही. गावातून निघाल्या पासून ते येथे पोहचल्या पासून विद्यार्थी अतिशय आनंदात सहलीचा मनमुरादपणे आनंद लुटला.

शैक्षणिक सहल यशस्वी करण्यासाठी शिक्षक मुख्याध्यापिका सोनाली सुतार, भास्कर , मुन्ना शेख व कम॔चारी तुकाराम रेड्डी, यांनी परिश्रम घेतले.