Home जळगाव समता परिषद कडून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना चौकशीचे निवेदन

समता परिषद कडून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना चौकशीचे निवेदन

201

शरीफ शेख

जळगाव / चाळीसगाव , दि. १४ :- तालुक्यातील कुंझर येथील अकरा वर्षीय बालक जयेश श्रावण चौधरी यांच्या मृत्यूची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी व्हावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद चाळीसगाव तर्फे करण्यात आली आहे सकृत दर्शनी घटनेची पार्श्वभूमी बघता संशय निर्माण होतो तब्बल ३६ तासा नंतर जयशचा मृत्यूदेह गावालगतच विहिरीत आढळून आला आहे. ज्याच्या मृत्यू पूर्वी याच विहिरीत पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी दोन दिवस अगोदर वेळोवेळी पाहणी केली होती मात्र त्यावेळेस तेथे कोणताही मृत्यू आढळला नाही. मात्र दिनांक १० / ०१ / २०२० रोजी शुक्रवार त्याचदिवशी विहीरीत जयशचा मृतदेह आढळून आला. व जयशचे घर व घटनास्थळ बघता खूप अंतर आहे. रात्रीची वेळ जयश त्याठिकाणी खेळण्याकामी ही जाऊ शकत नाही. किंवा त्यांच्या बरोबर त्यांचे मित्रही नव्हते एकटा मुलगा एवढ्या दूर कसा जाऊ शकतो. जयशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याच्या तोंडाजवळ रक्त बाहेर येत होते. त्यामुळे जयशचा अपपात झाला असावा असा संशय जयच्या कुटुंबीयांसह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तर्फे व्यक्त केला जात आहे. जयेशच्या मृत्यूची सखोल चौकशी करून घटनेमागील सत्यता पोलिसांनी समोर आणण्याचा प्रयत्न लवकर करावा व सदर कुटुंबास न्याय देण्याचाही प्रयत्न करावा. अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज मा. श्री गावडे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे कार्यालय चाळीसगाव येथे जिल्हा अध्यक्ष सतीश महाजन तालुका अध्यक्ष कैलास जाधव शहराध्यक्ष शांताराम चौधरी कुंजर येथील सरपंच तथा समता परिषद तालुका संघटक भगवान सोनवणे ग्रामसेवक गढरी भगवान रोकडे व कुंजर येथील ग्रामस्थ आणि समता परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.