Home जळगाव मुस्लीम मंच द्वारे सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा २० वा दिवस

मुस्लीम मंच द्वारे सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा २० वा दिवस

232

तांबापुर च्या पाच संघटनांचा सक्रिय सहभाग

शरीफ शेख

रावेर , दि. १४ :- जळगाव जिल्हा मुस्लिम मंच आयोजित भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालया समोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा सोमवार विसावा दिवस या दिवशी तांबापुर मधील शहीद शेरे हिंद टिपू सुलतान संघटना, हजरत उमर फाउंडेशन, के जी मल्टीपर्पज सोसायटी, तांबापुर फाउंडेशन, हजरत बिलाल फाउंडेशन व शहर एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी यांच्या सक्रिय सहभागाने २० व्या दिवशी निषेध करण्यात आला.

आजका शिवाजी नरेंद्र मोदी – या पुस्तका द्वारे शिवाजी महाराजांचा अपमान केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष व भगवान गोयल यांचा त्रीव निषेध करण्यात आला. शिवाजी महाराज यांची नरेंद्र मोदी सोबत तुलना करून पुस्तक छापले व त्याचे विधिवत प्रकाशन केले त्याबद्दल सर्वप्रथम मुस्लिम मंच तर्फे भारतीय जनता पक्षाचा व पुस्तकाच्या लेखकांचा त्रीव शब्दात धिक्कार करण्यात आला एवढेच नव्हे तर त्या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली यावेळी मुस्लिम मंच चे समन्वयक फारुख शेख, करीम सालार, मुकुंद सपकाळे, प्रतिभा शिंदे, अयाज़ अली, शरीफ शाह,यांनी निषेध नोंदविला.

उपोषणाला सुरुवात…
हाफिज रेहान यांनी पवित्र कुराणाचे पठण केले तर हमद वसीम खान यांनी सादर करून उपोषणाला सुरुवात झाली यात शरीफ शहा , नगर सेवक सादिक खाटीक, जाकीर बागवान यांच्या नेतृत्वात सदरचे उपोषण सुरू झाले.

साखल दंडाने बांधून भंगार गाड़ी लाउन निषेध –
रहीम खाटीक या तरुणाने स्वतःला साखळीने बांधून घेतले होते व पूर्ण तीन तास उभा राहून या भारतीय नागरिकत्व कायद्या मुळे व एनसीआर मुळे माझ्याजवळ कोणतेही कागद नसल्याने मला पुर्ण आयुष्य अशाच प्रकारे ड़ीटेंशन कैम्प मध्ये घालावे लागतील म्हणून मी आज पासून स्वतःला साखळीने बांधून घेत आहे.
शेख हुसेन रमजान हा भंगार जमा करणारा याने आपल्या लोड गाडीसह भंगार सामना सह येऊन विरोध नोंदविला कारण माझे वडील व माझे आजोबा हेसुद्धा भंगार जमा करून विकत असल्याने माझ्याकडे सुद्धा कोणतेही कागदपत्र नसल्याने मी कोणते कागदपत्र उपलब्ध करु हा प्रश्न मला भेडसावत आहे असे नमूद करून त्याने आपल्या भंगार सामानासह उपोषण करीत सक्रिय सहभाग नोंदविला.

*यांनी केलेले मार्गदर्शन* नगरसेवक सादिक खाटीक नगरसेवक सुनील महाजन याकूब खाटीक,हाफिस रेहान वसीम, मौलाना अश्फाक बागवान, अशीच अन्वर,मुफ़्ती हारून नदवी, मोहसिन काकर, हमीद जनाब ,असलम पिंजारी, फरीद खान, जाकीर बागवान, करीम सालार,अयाज़ अली, फारुक शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

महिलांनी ढोल वाजवून गीत सादर केले.

मोठ्या प्रमाणात महिलांची उपोषणस्थळी गर्दी झाल्याने त्यांनी आपल्या रितीरिवाजानुसार ढोल आणून त्यावर गाणे गाउन आपले दुःख व्यक्त केले ज्याप्रमाणे कोणाच्या घरी मौत होते. व दहावा तेराव्याला त्याच्या दुःखात सहभागी होऊन जे काही दुःख भरे गाणे गायले जाते तसेच या महिलांनी हे गाणे वाजून आपल्या दुख गीता द्वारे सी ए ए चा निषेध केला.
*उपोषणा ठिकाणी स्वेच्छेने घोषणा दिल्या**
धर्म की राजनीति नही चलेगी, नही चलेगी.
हम एन आर सी, सी ए ए के विरोध में नही, हम संविधान के समर्थन में खडे है।
पहिली ऐसी सरकार जो विदेशी नागरिकत्व देणे के लिये देश वासियो पर लाठी चार्ज कर रही है।
मेरा वोटर कार्ड अगर मेरी नागरिकत्व प्रमाण नही है तो मेरे चुने लोक खासदार कैसे ।
हिंदू-मुस्लीम एक है मोदी शहा फेक है।
हम तो बचपन से सोचते थे ताज महल हिन्दुस्तान का है ,भाजपा के राज में पता चला ये तो मुसलमान का है।

उपजिल्हाधिकारी भारदे यांना दिले निवेदन

जाकीर बागवान, खलीलूद्दीन शरीफ उद्दीन, शरीफ शाह हनीफ शाह,मोहम्मद हनीफ शेख आजम, विकार खान कयूम खान, जमीलोद्दीन शेख, वसीम शेख, शफि काकर, मुस्ताक पिंजारी, असलम कादर यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती –

खुदबुद्दीन काज़ी खान ,समशेर खान, सादिक खटिक, सुनील महाजन,फारूक अहेलेकर,तय्यब शेख,रईस शेख,नज़्ज़ु भांजा,दिलबाग छाबड़ा,हरिप्रसाद ,फरीदा बी,रेहाना बी,हाजरा बी,तबस्सुम आरा, सायमा बी,बुशरा बी,आमना बी,कासिम उमर, इमरान सिकलीगर,आदी उपस्थित होते.