Home परभणी धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेचे धरणे

धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेचे धरणे

157

प्रतिनिधी 

परभणी – लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाच्या विविध मागण्यासाठी धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न झाले .

धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले यावेळी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयात निवेदन देण्यात आले. गोमे वाकडी ता. सेलू येथील धनगर आरक्षणासाठी शहीद झालेला योगेश कारके त्याच्या कुटुंबियांस शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करावी .रेनापुर तालुका पाथरी येथील धनगर समाजाची हरवलेली स्मशानभूमी शोधून द्यावी या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले .त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. या निवेनावर धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, युवा स्वाभिमान पार्टी चे औरंगाबाद जिल्हा प्रमुख रामदास मंडलिक, धनगर साम्राज्य सेनेचे प्रदेश संपर्कप्रमुख रविकांत हारकळ,आनंद बनसोडे, अनिल भालेकर ,राधाकिशन कारके, कृष्ण हारके प्रभाकर आव्हाड, कैलास हजारे ,विष्णू हिंगे, दिगंबर हिगे, नानासाहेब नारले ,कुंडलीक काळे, रामभाऊ हिंगे ,पुंडलिक काळे दत्तराव वैद्य, गंगाधर पितळे ,किशोर करके, ऋषिकेश माने ,कृष्णा गोरे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.