Home महत्वाची बातमी
241

थेट खिशात लाच स्वीकारणारी ?महिला वाहतूक पोलीस निलंबित ,

अमीन शाह

पुुणे

: वाहतूक नियमन करताना एका महिला वाहतूक पोलिसाने अनोख्या पद्धतीने लाच स्वीकारली . संबंधित कर्मचारी थेट खिशात पैसे घेत असल्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली . यावरून ‘ कसुरी अहवाल ‘ वरिष्ठांकडे सादर करण्यात आला . त्यानंतर महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले . स्वाती सोन्नर , असे निलंबित करण्यात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे . सोन्नर या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत . पिंपरी येथील साई चौक येथे काही पोलीस वाहतूक नियमन करीत होते . त्यातील महिला वाहतूक पोलीस स्वाती सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या दोन महिलांना थांबविले . त्यावेळी काही जणांनी मोबाईलमध्ये याची व्हिडीओ क्लिप तयार केली .
महिला पोलीस सोन्नर यांनी दुचाकीवरून आलेल्या एका तरुणीला सूचना केली . त्यानंतर सोन्नर पाठमोऱ्या होताच संबंधित तरुणी सोन्नर यांच्या मागच्या खिशात पैसे ठेवत असल्याचे व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये दिसून येत आहे . वाहतूक पोलिसांच्या लाचखोरीच्या अनोखी शक्कलची चर्चा त्यामुळे झाली . त्यानंतर याप्रकरणी कसुरी अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या . त्यानुसार वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्फत पोलीस उपायुक्त यांच्याकडे अहवाल सादर करण्यात आला . त्यानंतर उपायुक्त यांनी गुरुवारी सायंकाळनंतर स्वाती सोन्नर यांच्या निलंबनाचे आदेश दिले . महिला वाहतूक पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे . तसेच त्यावेळी साई चौक येथे वाहतूक नियमन करीत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात येत आहे . – श्रीकांत डिसले , सहायक पोलीस आयुक्त , वाहतूक शाखा , पिंपरी – चिंचवड