Home मराठवाडा २०० क्विंटल सोयाबीनचा ट्रक लांबवला

२०० क्विंटल सोयाबीनचा ट्रक लांबवला

175

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना – परतूर शहरातून २०० क्विंटल सोयाबीन भरून धुळे येथे पाठवलेला व्यापाऱ्यांचा माल लंपास केल्याची तक्रार परतूर पोलिसात दाखल झाल्याने व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.


परतूर येथील होलानी ट्रेडींग कंपनी चे मालक तथा परतूर बाजार समितीचे माजी उपसभापती दिनेश होलानी यांनी खरेदी केलेला २०० क्विंटल सोयाबीन धुळे येथील दिशान ऍग्रो इंडस्ट्रीज धुळे यांना पाठवायचा होता.त्यासाठी त्यांनी शहरातील रोशन ट्रान्सपोर्ट चे नटवर खंडेलवाल यांच्याशी संपर्क साधला, खंडेलवाल यांनी सय्यद कैसर सय्यद अक्तर रा चारठाणा ता जिंतूर जी परभणी यांचा १० टायर ट्रक क्रमांक एम एच २४ एफ ८१९० भाड्याने मिळवून दिला. दि.२७ डिसेंबर ला सायंकाळी ४ च्या सुमारास या ट्रकमध्ये दिनेश होलानी यांनी आपल्या गोदमातून ३६२ कट्टे (२०० क्विंटल) सोयाबीन भरून रवाना केले.हा ट्रक दि २८ डिसेंबर ला दुपारपर्यंत दिशान इंडस्ट्रीज धुळे येथे पोहचणे अपेक्षित होते परंतु तो रात्रीपर्यंत न पोहचल्याने होलानी यांनी ट्रक मालक सय्यद कैसर यांना फोन लावून विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने होलानी यांना संशय आला.त्यामुळे त्यांनी परतूर पोलिसात ३० डिसेंम्बर रोजी ट्रक मालक सय्यद कैसर सय्यद अक्तर व ट्रक चालक भीमा कांबळे यांच्या विरोधात फसवणूक करून माल लंपास केल्याची तक्रार केली आहे.या तक्रारीवरून आरोपी सय्यद कैसर व ट्रक ड्रायव्हर भीमा कांबळे यांच्या विरोधात कलम ४२०,४०६,४०७ व ३४ अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.