बहुजन मुक्ती मोर्चा सह ३० संघटनांचा पाठींबा
शेख मुसा
जालना , दि. १५ :- केंद्र सरकारने लागु केलेल्या एनआरसी व सीएए कानुन विरोधात शुक्रवार दि.१७ जानेवारी रोजी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने काढण्यात येणार्या रॅली व जेलभरो आंदोलनात जिल्ह्यातील जवळपास ३० राजकिय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शवल्याची माहीती …देण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक माहीती अशी की,केंद्र सरकारने संविधान विरोधात एनआरसी व सीएए हा जाचक कायदा लागु केल्याने देशात अराजकता माजेल त्यामुळे या कायद्याला विरोध म्हणून संपुर्ण देशात आंदोलन करुन विरोध दर्शविल्या जात आहे.जालन्यात ही बहुजन मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दि.१७ जनवरी रोजी दुपारी २.३० वा अंबड रोड नुतन वसाहत येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासुन रॅलीस प्रारंभ होणार असुन जिलाधिकारी येथे सभाचे आयोजन व जेलभरो आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी डाॅ बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर चे प्रा. विलास खरात यांच्यासह आंदोलनात सहभागी असणार्या प्रत्येक संघटनेच्या प्रमुख व्यक्तीस मत मांडणार आहे.आंदोलनास जमियत उलेमा हिंद(महेमुद मदनी),तब्लीगी जमात,जमाते ईस्लामी हिंद,अहेले सुन्नत जमाअत,तंजीम पैगामे ईन्सानियत,हजरत ख्वाजा गरीबनवाज अॅकडमी,मराठा सेवा संघ,लोकमंगल सामाजिक संघटना,छञपती क्रांती संघटना,बहीजन क्रांती मोर्चा,लहुजी क्रांती मोर्चा,ईंडीयन लाॅयर्स असो.भारत मुक्ती मोर्चा,जमियत उलेमा हिंद(अर्शद मदनी),राष्टीय मुल निवासी संघटना,पाॅपुलर फ्रंट आॅफ ईंडीया,राष्टीय मुस्लीम मोर्चा,मोर्य क्रांती संघ,भारतीय विद्यार्थी संघ,बुद्धीस्ट ईंटरनॅशनल नेटवर्क,जमियत उलेमा हिंद,बीएस फोर,जयभिम सेना,जनहीत सोशल ग्रुप,मुस्लीम अॅण्ड बॅकवर्ड फेडरेशन,आॅल ईंडीया मोमीन काॅन्र्फेस,सफा बैतुल माल सह अनेक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे.या जेलभरो आंदोलनास धर्धनिरपेक्षता नागरिकांनी मोठ्या संख्यैने उपस्थित रहावे असे अवाहन मुफ्ती महमंद फहीम,सय्यद ईरफान कॅप्टन,मुफ्ती अ.रहेमान,हाफीज सय्यद मुजाहेद,कारी मौलाना अ.रउफ,शेख मुजीब,सय्यद अ.खुद्दुस,अॅड महेंद्र वेडेंकर,असद रजवी,नंदाताई लोखंडे,सोहेल नदवी,भिमराव वाघ,अण्णासाहेब चितेकर,सुदाम बनसोडे,यशोपाल गवई,हाजी अब्दुल हमीद,मोईज अंसारी,कारी मुजाहेद,हाफीज अजगर,मिर्झा अप्सर बेग,सुरेश डावकरे,विष्णु चंद,सुधाकर निकाळजे,रोहीदास गंगातिवरे,शाम शिरसाठ,यांच्या सह विविध संघटनाच्या पदाधिकार्यांनी केले आहे.