Home मराठवाडा कारागृहातील महिला बंदी करीत हळदी कुंकू कार्यक्रम सम्पन्न

कारागृहातील महिला बंदी करीत हळदी कुंकू कार्यक्रम सम्पन्न

154

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. :- 15-01-2020 रोजी “मकरसंक्रांती” निमित्त गुरु गौतम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था , महिला बालविकास बहुउद्देशीय संस्था हडको व विमला सदन औरंगाबाद या संस्थेमार्फत कारागृहातील महिला बंदी करिता ” हळदी कुंकवाचा कार्यक्रम ” ठेवण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे वेळी बंदी यांचा गायनाचा छोटा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रमास उपस्थितांनी भरभरून दाद दिली सदर कार्यक्रम प्रसंगी सौ मंगलाताई रघुनाथ टोणपे अध्यक्ष महिला व बालविकास बहुउद्देशीय संस्था हडको औरंगाबाद , तसेच ॲडव्होकेट माधुरीताई अदवंत व सौ मनीषा भनसाळे , अध्यक्ष,गुरु गौतम बहुद्देशिय सेवा भावी संस्था औरंगाबाद व सिस्टर लियोनी मॅडम , विमला सदन औरंगाबाद या उपस्थित होत्या.