Home महत्वाची बातमी चालत्या लक्झरी बसमध्ये तरुणीवर चाकूच्या धाकावर बलात्कार ,

चालत्या लक्झरी बसमध्ये तरुणीवर चाकूच्या धाकावर बलात्कार ,

814

 

संतापजनक घटना

अमीन शाह

वाशिम,

 

महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचार थांबण्याचं काही नाव घेत नाही. दररोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. गोंदियावरून पुण्याला जाणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडलीय. चालत्या खासगी बस ट्रॅव्हल्समध्ये विनयभंग करून वाशिमच्या मालेगाव परिसरात बलात्कार केल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
संबंधित तरुणीवरील बलात्काराची घटना 6 जानेवारीला घडलीय. या घटनेनंतर तरुणीचं मानसिक स्वास्थ खचलं होतं. पीडित तरुणीने पुण्यात पोहोचताच पोलिसांत तक्रार दिल्याने घडलेला सारा प्रकार समोर आला आहे. आरोपीने पीडित तरुणीला सीट नंबर तुमची नसल्याचं कारण सांगून मागच्या सीटवर बसवले आणि त्यानंतर चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. तसंच घडलेल्या घटनेची वाच्यता केल्यास चालत्या गाडीतून फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली.