Home जळगाव मुस्लिम धर्मगुरू गरीब नवाज यांची विटंबना करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल….

मुस्लिम धर्मगुरू गरीब नवाज यांची विटंबना करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल….

318

रावेर – शरीर शेख

संपूर्ण भारतातील सर्व सुफी संतांचे प्रमुख व महान धर्मगुरू, सर्व धर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक, गंगा – जमनी तहजीब चे मुख्य केंद्र, आशिया खंडात इस्लाम धर्म आणणारे, संपूर्ण जगाला शांती, अहिंसा व सद्भावनेचा मार्ग दाखवणारे मुस्लिम धर्मगुरू गरीब नवाज र.अ. यांच्याविषयी अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या व त्याला सहकार्य करणाऱ्या व्यक्तीवर (विटंबना करणारी व्यक्ती)जळगाव शहरातील शनिपेठ पो. स्टे. येथे दि. ६/१/२०२० बुधवार रोजी जळगाव शहरातील अहले सुन्नत वल जमात, सुन्नी मुस्लिम बरेलवी धर्मगुरू, सर्व सुन्नी मस्जिद, ईदगाह, मदरसा चे ट्रस्टी यांच्या शिष्टमंडळाने शनिपेठ पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल ससे यांची भेट घेऊन चर्चा करून सदर प्रकरणी या गुन्ह्यात सामील असलेल्या आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहिता व आई . टी. ॲक्ट नुसार 153 – ए, 295 – ए, 296 आणि 298 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रसंगी सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सुन्नी जामा मस्जिद जळगाव चे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सुन्नी जामा मस्जिद चे मौलाना जाबीर रजा, रजा मस्जिद मेहरून चे मौलाना नजमूल हक मिसबाही, ख्वाजा मिया दर्गाह मस्जिद चे मौलाना हनीफ रजा, मस्जिद या गोसे आजम फातिमा नगर चे मौलाना मुफ्ती गुलाम हसनैन, मदरसा जामिया आयेशा अमिनुल उलूम चे हाजी इक्बाल वजीर, मस्जिद ताजु शरिया हजरत उमर कॉलनी चे मौलाना मुबारक हुसेन अली, मस्जिद गरीब नवाझ भारत नगर चे मौलाना शमीम अखतरुल कादरी, हाजी अब्दुल रशिद कुरेशी, मस्जिद गुलशन – ए – चिश्तीया रझा आझाद नगर पिंप्राला चे हाजी अहमद खान, मस्जिद अशरफ – ऊल – फुखहा उस्मानिया पार्क चे मौलाना वासेफ रझा, नूर मुहम्मद, दानिश हुसेन, शाकिब फारुख इ. उपस्थित होते.