Home विदर्भ देवळी पंचायत समिती येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचे वस्तीचा विकासासाठी अंतर्गत...

देवळी पंचायत समिती येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचे वस्तीचा विकासासाठी अंतर्गत आढावा.!

259

योगेश कांबळे

वर्धा –  जिल्ह्यातील देवळी पंचायत समितीमध्ये मंगळवारी( ता.12) पंचायत समिती देवळी येथे जिल्हा परिषद चे समाज कल्याण सभापती विजय आगलावे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा वैशालीताई येरावार यांचे प्रमुख उपस्थितीत समाज कल्याण विभागा मार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाचे वस्तीचा विकास करणे अंतर्गत आढावा सभा घेण्यात आली.
सभेमध्ये पुढील कामाचा आढावा झाला. यामध्ये
अपूर्ण कामाचा आढावा,अखर्चित निधी परत करणे ,सन २०२०-२०२१ चे मंजूर कामाचे प्रस्ताव त्वरित सादर करणे.
आदी बाबत आढावा घेण्यात आला . याबाबत समाज कल्याण सभापती यांनी सूचना व मार्गदर्शन केले सभेला पंचायत समितीच्या सभापती कुसुमताई चौधरी, गटविकास अधिकारी पंकज भोयर, साहाय्यक गटविकास अधिकारी अनिल आदेवार आदेवार, विस्तार अधिकारी पंचायत दिलीप ढोणे,समाज कल्याण निरीक्षक कोंडे, साहाय्यक लेखा अधिकारी चौधरी,तसेच सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व माहिती विस्तार अधिकारी पंचायत दिलीप ढोणे यांनी दिली व कार्यक्रमाचे आभार सहाय्यक गटविकास अधिकारी अनिल आदेवार यांनी मानले.