Home बुलडाणा मराठा सेवा संघाच्या विश्वभूषण मराठा पुरस्कारांने नामदार राजेश टोपे सन्मानित

मराठा सेवा संघाच्या विश्वभूषण मराठा पुरस्कारांने नामदार राजेश टोपे सन्मानित

498

मराठा सेवा संघाच्या विश्वभूषण मराठा पुरस्कारांनी नामदार राजेश टोपे सन्मानित

 

अमीन शाह

सिंदखेड राजा
मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च असा विश्वभुषण मराठा पुरस्कार यंदा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात अतिशय चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्त मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टी वर सन्मानित करण्यात आले कोरोणाच्या पार्श्वभूमीमुळे सोशल डिस्टंसिंग ठेवत अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत फेसबूक सोशल मीडियावर थेट लाईव्ह प्रसारण हा पुरस्कार मोठ्या सन्मानाने भक्तीभावाचा वातावरणात नामदार राजेश टोपे यांना देण्यात आला यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर बुलढाणा चे पालकमंत्री शिवश्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार श्वेता ताई महाले माजी आमदार रेखाताई खेडेकर राकाँचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थित जिजाऊ सृष्टी येथे व्यासपीठावर उपस्थित होते जागतिक महामारी असलेल्या कोरोणाच्या काळात र आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भक्कम आणि मैलाचा दगड ठरेल अशी कामगिरी करून कोरोना वर नियंत्रण मिळवले याची दखल विविध राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी तर घेतलीस मात्र जागतिक आरोग्य संघटनेने याची दखल घेतल्याने हा पुरस्कार नामदार राजेश राजेश टोपे यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी बोलताना पुरस्कार मिळाल्याबद्दल नामदार टोपे यांनी आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप मोठे बळ मिळाले आहे भविष्यात आणखी चांगले काम करण्याची ताकद मिळाली आहे कोरोणाच्या काळात जागतिक महामारी असलेल्या कोरोणावर नियंत्रण करण्यासाठी डॉक्टर आरोग्य कर्मचारी नर्सेस आशा वर्कर्स एवढेच नव्हे तर जे अंबुलन्स ड्रायव्हर स्मशानभूमीत अग्नि देणारे माणसे या कामात सहकार्य करत होते आपली जीवाची पर्वा न करता हजारो-लाखो जीव वाचावे म्हणून काम करत होते त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मी लीड फॉर्म फ्रंट म्हणून त्यांच्यासोबत उभा राहिलो त्यामुळे आपल्या सोबत सरकार आहे अशी भावना या काम करणाऱ्या त्याच्या मनात निर्माण झाल्याने खऱ्या अर्थाने कोरणा वर नियंत्रण मिळविण्यात आले कॉर्नर च्या पार्श्वभूमीवर काम करताना नामदार टोपे यांनी सांगितले की खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट चालली होती ही कॉर्पोरेट हॉस्पिटल लोकांकडून मोठ्या प्रमाणात घ्यायचे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली होती याची दखल घेत सर्वसामान्य लोकांनाही खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावे यासाठी अत्यंत कमी दरात तेथे उपचार केले तेथे ऑडिटर बसवले जय हॉस्पिटल नि जास्त बिल घेतले त्याच्याकडं मोठ्या प्रमाणात वसुली केली कोरोणाच्या ज्या टेस्ट साडेचार पाच हजार रुपयात व्हायच्या त्याचे अपडेट करून त्या 700 रुपये पर्यंत खाली आणल्या त्यामुळे सर्वात स्वस्त उपचार आपल्या महाराष्ट्रात व्हायला लागलेत असे सांगून सर्वसामान्य लोकांना केंद्रबिंदू मानून आपण करो णासाठी काम केले त्याची दखल घेत मला हा मराठा विश्वभूषण हा सर्वोच्च पुरस्कार दिला त्यामुळे मला खऱ्या अर्थाने काम करण्याचे बळ मिळाले असे सांगून मी हा पुरस्कार महापुरुषांना आणि जे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे आहेत त्यांना मी अर्पण करतो असे सांगून शेतकऱ्यांच्या मुलांनो मराठ्यांनो कुणबी समाजाच्या मुलांना तुम्ही नोकरीच्या पाठीमागे न लागता नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा आळस सोडा उद्योगधंदे करा शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान येत आहे काळ बदलला आहे त्यामुळे काळासोबत झाला पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करा राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्यात मोठ्या सबसिडी आहेत त्या त्यासाठी प्रयत्न कर जे विकल्या जाते तेच पिकवा बाजारपेठेवर लक्ष द्या असे आवाहन यावेळी आमदार राजेश टोपे यांनी केले मराठा समाज यांना आरक्षण मिळालेच पाहिजेत अशी आपली स्पष्ट भूमिका असल्याचे नामदार टोपे यांनी सांगितले पुढे बोलताना नामदार टोपे यांनी महाराष्ट्र आर्थिक सक्षम राज्य आहे अस सांगून कुणीही या राज्यात कुणीही उपचारापासून वंचित राहणार नाही प्रत्येक गणात दीड लाखापर्यंत रुग्णालयात मोफत उपचार मिळतील असेही आमदार टोपे यांनी सांगितले बुलढाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला मेडिकल कॉलेजचा विषय नक्की मार्गी लागेल माझ्या टेबलवर ते प्रकरण सहीसाठी आले असून लवकरच बुलढाण्यात मेडिकल कॉलेजला मान्यता मिळेल अशी ग्वाही देत नामदार तुपे यांनी मात्र ते ठिकाण सिनखेडराजा की बुलढाणा हे तुम्ही ठरवा असेही नामदार टोपे यांनी सांगून जिजाऊ विकास आराखड्यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच अजितदादा यांच्या उपस्थितीत नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि आणि मी तसेच तुमच्यातील प्रतिनिधी यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक बोलावणार असल्याचे नामदार राजेश टोपे यांनी सांगितले
यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा चे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आपण जिजाऊ विकास आराखड्यासाठी देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री असताना 250 कोटी रुपयांचा विकास आराखडा आणि त्यानंतर साडे तीन कोटीचा विकास आराखडा मांडला गेला होता या दोन्ही विकास आराखड्यासाठी मंत्रालय मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक लावून विकास आराखड्याला मंजूर करण्यात येईल अशी शाश्वती पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिली यावेळी बोलताना विरोधी पक्षातील असलेले आमदार श्वेता ताई महाले यांनी जिजाऊ सृष्टीचा विकास झाला पाहिजे वेळप्रसंगी त्यासाठी आंदोलन करू अशी मागणी केली होती त्याचा धागा धरत पालकमंत्री डॉक्टर शिंगणे यांनी श्वेता ताई महाले याना म्हणाले की तुम्ही विरोधात आहात सरकार आर्थिक अडचणीत आहे आणि आमची हक्काची जीएसटीचे 27 के 28 हजार कोटी केंद्र सरकार कडे आहेत ते येणे बाकी आहेत त्यामुळे तुमचे कोणी ऐकत असेल तर ते देण्यासाठी प्रयत्न करा जिजाऊ आराखड्यासाठी तुम्ही मुंबईला आंदोलन करता करा आम्ही तिथे दिल्लीत आंदोलन करू असे सांगितल्याने एकच हास्यकल्लोळ पिकला यावेळी तुम्ही मला लोकसभेत जाऊ देत नाही याची खंतही व्यक्त केली यावेळी एकच हास्यकल्लोळ पिकला याप्रसंगी बोलताना मराठा सेवा संघ यांच्या वतीने राजेश भय्या सारख्या योग्य अशा व्यक्तीला सर्वोच्च असा मराठा विश्वभूषण पुरस्कार दिला त्याबद्दल आयोजन समितीला धन्यवाद देत जिजाऊंच्या जन्मभूमीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले यावेळी श्वेता ताई महाले संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता गंगाधर बनवरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन तनपुरे जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरीताई भदाणे आदींनी आपले विचार मांडले यावेळी अंध असलेल्या आय एस अधिकारी प्रांजल पाटील यांनीदेखील ऑनलाइन मार्गदर्शन केले या कार्यक्रमांमध्ये शाहीर रामदास कुरंगळ यांना मराठा शाहीर पुरस्कार मराठा आणि असलेली आहेस आयएएस अधिकारी शिवश्री प्रांजल पाटील यांना जिजाऊ पुरस्कार तसेच एस के सूर्यवंशी यांना पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रा मानकर यांनी केले यावेळी व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर माजी आमदार रेखाताई खेडेकर डॉक्टर मनोहर तुपकर नामदार डॉक्टर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी रजनीताई शिंगणे मुलगी राखाची जिल्हाध्यक्ष एडवोकेट नजर काजी मनिषाताई टोपे वनिताताई अरबट वंदनाताई आखरे प्रदीप बिलोरे संजय विखे विलास तेजनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते