रावेर (शरीफ शेख)
तालुक्यातील चिनावल वडगाव रस्त्यावरील पुलाची दुरावस्था गेल्या आठ ते दहा वर्षापासून फार बिकट झालेले असून हा पूल पुराच्या पाण्यामुळे मधूनच वाहून गेलेला असून रस्त्याचा संपर्क तुटलेला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्याध्यक्ष विलास ताठे यांनी नुकतेच आमदार शिरीष चौधरी यांना दिले.
या पुलावरून चिनावल वडगाव येथील शेतकरी व शेतमजूर दररोज शेकडोंच्या संख्येने ये जा करत असत.परंतु हा पूलंच वाहून गेल्याने या ठिकाणचा संपर्क तुटलेला आहे.म्हणून चिनावल वडगाव येथील शेतकरी व शेतमजूर तसेच वाहन चालक पूलाच्या साइडणे नदीतून जिव घेणा प्रवास करत आहे.या ठिकाणी खराब रस्त्यामुळे बऱ्याच वेळा रिक्षा पलटी होणे, मोटरसायकली स्लीप होणे असे छोटे-मोठे अपघात सतत होत असतात.या पुलावरून अवजड वाहने बऱ्याच वर्षांपासून बंद झालेले असून यामुळे शेतकऱ्यांचा तसेच शेतमालासाठी जाणारे-येणारे ट्रक यांचे खूप नुकसान होत आहेत. याबाबत आमदार, खासदार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन त्वरित या पुलाचे बांधकाम करून शेतकरी व शेतमजूर यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तसेच समाजसेवक विलास ताठे , तालुकाध्यक्ष किरण पाटील राष्ट्रवादी पदवीधर रावेर आणि चिनावल वडगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. परिणामी वाहनधारकांना या पुलावरून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाच्या साईडने उत्तरत्या रस्त्याने मार्ग काढावा लागतो.