Home विदर्भ पळसगाव येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेला युवक कॅनलमधे गेला वाहून.!

पळसगाव येथील रोजगार हमी योजनेच्या कामावर गेलेला युवक कॅनलमधे गेला वाहून.!

1305

योगेश कांबळे

वर्धा –  जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पळसगाव येथील गजानन विनायक म्हैसकार वय 28 हा युवक रोजगार हमी योजनेच्या कॅनल साईटसवर समशान भुमि जवळच्या कामावर असताना कॅनल मधे वाहून गेला असल्याची घटणा आज बुधवारी (ता. 13) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

नांदोरा फत्तेपुर कॅनल साईटसवर रोजगार हमी योजने अंतर्गत झाडाला आळे करण्याचे काम सुरू होते. दुपारी दोन मजुर घरून जेवण करून साईडवर येत असतांना गजानन याला शौचास लागल्याने तो कॅनलच्या काठावरती शौचास बसला ,
शौचास झाल्यावर तो पायातील बुट काढून शौचास धुणेकरिता पाण्यात उतरला असतांना तोल जावून पाण्यात पडला असता कॅनलच्या पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला.
गजानन बराचवेळ दिसत नसल्याने त्या कामावर असलेल्या मजूराने चौकशी केली असता दिसुन आला नाही . घरी जावून चौकशी केली तिथे सुध्दा तो नसल्याने पुन्हा शौचास बसलेल्या त्या जागेवर जोडे व घसरुन असल्याचा खुणा दिसल्याने त्या मजुराने गावातील पोलिस पाटलाना या बाबत महीती दिली. पोलिस पाटील यांनी लगेच देवळी पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती दिली असता पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. व वाहून गेलेल्या युवकांचा शोध वृत्त लिहेस्तोवर देवळी पोलीसांकडुन सुरू होता.