Home मराठवाडा प्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार

प्रियदर्शनी बँकेतर्फे शाखा कुंभार पिंपळगाव येथे ग्राहक मेळावा,पत्रकारांचा सत्कार

354

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

जालना –  जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव शहरामध्ये प्रियदर्शनी बँके तर्फे ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बँकेचे चेअरमन सी.ए. नितीन तोतला व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन वाणी यांनी मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात बँकेचे कर्ज व इतर सोई सुविधा सेवा बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. या मेळाव्यास कुंभार पिंपळगाव येथील व्यापारी, खातेदार व पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा बँकेतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष बळीराम जिगे ,संचालक मंडळ सर्वश्री दादाराव अटकळ, सुरेश पंडा,भरतराव कंटुले, माणिक टेहळे, विष्णू आप्पा कंटुले,नारायण नारेडा, भांडळकर सर,स्वामी कनके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले, पत्रकार दिगंबर गुजर, लक्ष्मण बिलोरे, बबन कुलकर्णी व सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रियदर्शनी बँक शाखा कुंभार पिंपळगाव चे मॅनेजर विलास खंडागळे यांनी केले.