योगेश कांबळे
वर्धा – जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील मांडगाव तरोडा रस्त्यावर सुजातपुर सावंगी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार घेऊन जात असलेल्या टवेरा व दुचाकीची समोरा समोर धडक झाल्याने या झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.तर चारचाकी तवेरा मधिल ६ जण गंभीर जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवार दिनांक १५ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास सुजातपुर येथिल ग्रामपंचायत निवडणुकी करीता तरोड्यावरून सुजातपुर येथे मांडगाव येथील वैभव वरवटकर हे शारदा बकाल वय ४८ वर्ष, आचल बकाल वय २१ प्रियंका बकाल वय २७,रेखा वानखेडे वय ६० वर्ष, विष्णू डंभारे वय ४० वर्ष हे जात असताना तरोडा मांडगाव रसत्यावर बोथुडा पाटी जवळ दुचाकीने तरोड्याकडे जात असलेल्या पंकज देशमुख वय २४ वर्ष राहणार सुजातपुर याची दुचाकी तवेरावर धडकल्याने या झालेल्या अपघात दुचाकीस्वाराचा मुत्यू झाला तर टवेरा चालक व वैभव वरवडकर याच्यासह शारदा बकाल वय ४८ वर्ष,आचलं बकाल वय २१ प्रियंका बकाल वय २७,रेखा वानखेडे वय ६० वर्ष, विष्णू डंभारे वय ४० वर्ष हे गंभीर जखमी झाले.सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.