ईकबाल शेख
मानवविकास साधनाश्रमात अंत्यसंस्कार : पुर्व विदर्भातील असंख्य गुरुदेवभक्तांनी वाहिली साश्रुनयनाने श्रद्धांजली
वर्धा – तळेगांव (शा.पं.) :-श्रीसमर्थ लहानुजी महाराज कृपाप्रसादीत व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पाईक तथा मानव विकास ज्ञानसाधनाश्रमाचे संचालक ग्रामगीतादास आचार्य बालब्रम्हचारी रामकृष्णदादा अत्रे महाराज यांच्या पार्थीवावर तळेगांव (शामजीपंत) येथे मानव विकास ज्ञान साधनाश्रमामध्ये हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवारला तळेगांव (शा.पं.) येथील मानव विकास ज्ञानसाधनाश्रमात सांयकाळी ज्ञानसाधना करुन सामुदायीक प्रार्थना आटोपल्यानंतर विश्रांती करीत असतांना अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने ७.५० मिनीटांनी निधन झाले.ते ७१ वर्षाचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच रात्रीपासुन त्यांच्या असंख्य चाहत्यांनी तळेगाव येथील साधनाश्रमात अंत्यदर्शनाकरीता गर्दि केली होती. आचार्य रामकृष्णदादा अत्रे महाराज यांनी बालपणापासुन श्रीसर्थ लहानुजी महाराज हयात असतांना पर्यंत ते सन १९९३ पर्यंत संमर्थ लहानुजी महाराज संस्थान येथे अविरत सेवा दिली होती तर सन १९९३ पासुन तळेगांव (शा.पं.) येथे ग्रामगिताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर यांनी स्थापन केलेल्या मानविकास ज्ञानसाधनाश्रमामध्ये वास्तव्यास राहुन माैन साधना विपश्यना शिबीर तसेच दरवर्षी उन्हाळ्यात १ मे ते ३० मे दरम्यान बालसंस्कार शिबिर घेवुन हजारो सुस्कांरीत पिढि निर्माण केली. त्याकरिता ते चंदनासारखे आपला देह सतत झिजवित होते. तर वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचीत ग्रामगीतेचा प्रचार व प्रसार होण्याचे उद्देशाने खेडोपाडी जावुन गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते तयार करुन राष्टसंताचे विचार घराघरात पोहचविण्या करीता सतत कार्य करीत होते.त्यांनी आपला देह दानाचा संकल्प सुद्धा केला होता. त्यांच्या निधनामुळे असंख्य गुरुदेव प्रेमी व त्यांच्या चाहत्यांवर दुख:चा डोंगर कोसळला असुन येथे हजारो गुरुदेव भक्तांनी अंत्यदर्शन घेवुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.शनिवारला येथील मानव विकासज्ञान साधनाश्रमात पुर्व विदर्भातील कानाकोपर्यातील असंख्य गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी माजी आमदार अमरभाऊ काळे, प्रफुलदादा वागदरे, सत्यपाल महाराज, रामशक्ती महाराज, हळदे महाराज, कनेरकर महाराज, सचिन देव महाराज, संत सयाजी महाराज, डाॅ. अरुन पावडे, हरीदासजी वेरुळकर गुरुजी, प्रकाश महाराज वाघ सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी, सुश्री माई रामप्रियाजी, पोर्णिमाताई सवाई, जनार्दन बोथे सरचिटनीस गुरुकुंज आश्रम मोझरी, ज्ञानेश्वरदादा रक्षक, वसंतदादा देशमुख, बाळासाहेब पावडे अध्यक्ष समर्थ लहानुजी महाराज संस्थान टाकरखेड आदी उपस्थित होते. अद्वैताचार्य संतकुमार रामशक्ती महाराज यांचे अध्यक्षतेखाली शोक सभा घेण्यात आली. यावेळी मान्यवरांनी शब्द सुमनांनी आचार्य अत्रे महाराजांना श्रद्धांजली वाहिली.बालब्रम्हचारी प्रफ्फुलदादा वागधरे, यांनी मुखाग्नी दिला. हजारो गुरुदेव भक्तांनी माैन श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी महिला मोठ्या संख्यने उपस्थित होत्या.