सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगावमही , साखरखेर्डा , मलकापूर पांगरा , शेंदुर्जन , किनगावराजा , दुसरबीड , या शहरीकरणाने व भौगोलिक दुष्ट्या मोठ्या असलेल्या ग्रापंचायतींसह अनेक गावांत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आल्याने जिल्ह्याचे नेते पालकमंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे साहेब यांचे सिंदखेडराजा मतदार संघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचे अधोरेखित झाले आहे . सिंदखेड राजा तालुक्यातील 43 ग्रामपंचायतींचे निकाल आज लागले . मतदारांनी प्रस्थापितांना नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे बहुतांश ग्रामपंचायतीच्या निकालातून दिसून येत आहे . आज सिंदखेड राजा नगर पालिका टाऊन हॉलमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली . साखरखेर्डा व दुसरबीड या दोन ग्रामपंचायती तालुक्यात सर्वांत मोठ्या असून , साखरखेर्डा येथे शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास पॅनलला एक जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत परिवर्तन पॅनलला 16 जागा मिळाल्या . दुसरबीड येथे 17 जागांपैकी एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली आहे . उरलेल्या 16 पैकी 12 जागी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने बाजी मारली . दुसरबीड विकास आघाडीच्या पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले . आंबेवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे . निवडणूक निकालादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता ,
साखरखेर्डा येथे राष्ट्रवादीचे वर्चस्व ,
ज्योती अमित जाधव विदर्भात सर्वात जास्त मताने विजयी ,
तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत साखरखेर्डा येथे अत्यन्त चुरशीची लढत होऊन या लढतीत राष्ट्रवादीचे 16 उमेदवार विजयी झाले तर सेनेचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला असून येथे झालेल्या निवडणुकीत जिला परिषद सदस्य रामभाऊ जाधव यांच्या सूनबाई ज्योती अमित जाधव यांनी इतिहास रचला असून त्या विदर्भातून सर्वाधिक मतधीक्क्याने विजयी झाल्या आहेत ,सर्वत्र याची चर्चा केली जात आहे ,
दोन सख्खे भाऊ विजयी ,
साखरखेर्डा येथे आज झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री डॉ , राजेंद्र शिंगणे यांच्या अत्यन्त जवळचे 25 वर्ष येथील सत्ता गाजवणारे माजी सरपंच स्वर्गीय युसूफ सेठ कुरेशी यांचे पुतणे दाऊद सेठ कुरेशी हे वॉर्ड क्रमांक 6 मधून तर त्यांचे भाऊ अय्युब सेठ कुरेशी हे वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडून आले असून त्यांनी ही इतिहास रचला असून प्रथमच दोन सख्खे भाऊ एकत्र निवडून आले आहेत , येथे मतदारांनी आनंदोत्सव साजरा केला आहे ,