अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या संघर्षाला अखेर यश!
एकच व्यक्ती दोन नावाने शासनाची करतो लूट
आसाराम नावाने नौकरी तर अशोक नावाने राशन दुकान!
तीन महिन्याचे जनतेचे राशन विकले काळ्या बाजारात
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीने गुन्हा दाखल करण्याची विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्या कडे केली मागणी
प्रतिनिधी परभणी:
शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी ता.पाथरी जि.परभणी येथे कार्यरत सेवक अशोक सोपान नखाते यांनी आसाराम सोपान नखाते या खोट्या नावाने टीसी व जन्म प्रमाणपत्र व इतर खोटे कागदपत्रे तयार करून संबंधित शाळेत नौकरी मिळवून लाखो रुपये पगार शासनाची प्राप्त करून शासनाची फसवणूक मोठा भ्रष्टाचार केला आहे तसेच सदर सेवक शाळेत वेळेवर ड्यूटी न करता रेशन दुकानावर व्यापार करतो शाळेचे मुख्याध्यापक व संस्थाचालक नातलग असल्याने संगणमत करून हजेरी पटावर खोटी सही करून पगार घेऊन शासनाची फसवणूक व मोठा भ्रष्टाचार केला आहे.
सदर व्यक्तीचा रेशन दुकान असून सन 2018 मध्ये फरवरी, मार्च, एप्रिल महिन्याचे गहु, तांदूळ, साखर शासनाकडून एकूण 523.14 क्विंटल प्राप्त करून हदगाव व जवळा झुट्टा रेशन कार्डधारकांना वाटप न करता काळ्याबाजारात विक्री करून गोरगरीब जनतेची व शासनाची फसवणूक केली आहे व मोठा भ्रष्टाचार केला आहे त्यामुळे सदरील व्यक्तीची सीबीआय व सीआयडी मार्फत चौकशी करून संबंधित दोषी अधिकारी व अशोक सोपान नखाते यांच्या वर FIR नोंद करून व्याजासह रक्कम शासन तिजोरीत जमा करावी अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद यांच्याकडे तक्रार केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परभणी मार्फत चौकशी केल्याने दोन वेगवेगळ्या नावाचा व्यक्ती एकच असल्याने निष्पन्न झाले आहे. त्याअर्थी महाराष्ट्र शेडयुल्ड कमो डीटीएच (रेगुलेशन ऑफ डिस्ट्रीब्यूशन) ऑर्डर 1975 चे कलम 3 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये व मा.जिल्हाधिकारी परभणी यांचे आदेश क्रमांक 2006/ पुरवठा एफपीएस /बीडी 2908 दि.1.7 2006 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये श्री.मंजुषा जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी मौजे हदगाव बुद्रुक तालुका पाथरी जिल्हा परभणी येथील स्वस्त धान्य दुकानदार श्री अशोक नखाते यांच्या नावे असलेल्या रास्त भाव दुकानाची संपूर्ण अमानत रक्कम जप्त करण्यात येऊन रास्तभाव दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी परभणी यांनी सौदागर मोहम्मद रफी यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.