Home सातारा तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच मतदान ड्युटी वरील प्राथमिक शिक्षकास अमानुष मारहाण शिक्षक संघटनांनी...

तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच मतदान ड्युटी वरील प्राथमिक शिक्षकास अमानुष मारहाण शिक्षक संघटनांनी केला निषेध

276

सतीश डोंगरे 

मायणी:- दि. १९ :- खटाव तालुका तहसीलदार कार्यालय वडूज येथे मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या प्राथमिक शिक्षकांस किरकोळ कारणावरून अमानुषपणे मारहाण करण्यात आली असून सदर मारहाण महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनीच केली असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे.

या घटनेचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निषेध करण्यात आला असून या बाबतीत निवडणूक विभागाने चौकशी करून दोषींवर .योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने खटावच्या तहसीलदारांना देण्यात आले आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे ,संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की, नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. खटाव विकास गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कठरे वाडी .ता. खटाव येथील उपशिक्षक प्रसाद दत्तात्रय महामुनी हे ग्रामपंचायत निवडणूक कमी चितळी तालुका खटाव या गावी ड्युटीवर होते मतदान .संपल्यानंतर सायंकाळी सदर पेट्या व निवडणूक साहित्य जमा करण्यासाठी प्रसाद महामुनी हे वडूज तहसील कार्यालयात आले होते. सायंकाळी वडूजहून मायणीला येण्यासाठी वाहन नसल्याने ते स्वतःचे वाहन घेऊन वडूजला आले होते .त्यांनी आपले वाहन तहसील कार्यालया समोरील रस्त्यालगतच उभे केले होते. त्यानंतर तहसील कार्यालयात साहित्य जमा केल्यानंतर ते त्यांच्या वाहना जवळ आलेले. सदर वेळी काही महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपण या ठिकाणी गाडी का लावली? ही गाडी तुमची आहे का? असे विचारुन सात ते आठ कर्मचारी व निवास कदम यांनी प्रसाद महामुनी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली.
सदर घटनेचा खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने निषेध करण्यात येत असून सदर घटनेची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी तालुका शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) जि. प. सातारा ,गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती खटाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.
(शासकीय आवारातच प्राशासकीय कर्मचाऱ्याला ऑन ड्युटी मारहाण होणे हे निंदनीय असून यावर खटाव तालुका तहसीलदार व पोलीस प्रशासन काय कार्यवाही करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.