मायणी – सतीश डोंगरे
सातारा , दि. १६ :- जिल्ह्यातील संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या मायणी गावचा विकास राजकीय द्वेषापोटी रखडला होता परंतु आता युवापिढीने कारभार हातात घेतल्याने जुनी जळमटे काढून टाकली असून 2017 पासून विकासाची नवीन पहाट उगवली आहे आत्ताच्या तरुण मंडळीने पाणीप्रश्न आरोग्य अंगणवाडी गटार इत्यादी योजनेवर फोकस टाकला असून यापुढील काळात मायणी चा नागरी विकास हाच आमचा ध्यास आहे असे ठोस प्रतिपादन युवा नेते सचिन गुदगे यांनी मायणी येथे बोलताना व्यक्त केले मायणी येथे 14 व्या वित्त आयोगातून 25 ,15 योजनेअंतर्गत रामोशी वाडा येथे गटार बांधणे गटार बंदिस्त करण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते आपल्या भाषणात सचिन गुदगे पुढे म्हणाले रामोशी वाडा हा आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला आहे येथील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी प्रथम रामोशी वाडा येथे निधीची नियोजन करत आहे यावेळी गावठाण येथील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सचिनदादा गुदगे उपसरपंच आनंदा शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला .
या उद्घाटन प्रसंगात ग्रामपंचायत सदस्य विजय कवडे राजू ठोंबरे आनंदा शेवाळे अभिजीत माळी विलास झोडगे मुबारक मुलानी सौ कदम, विठ्ठल तळेकर दत्तात्रेय काबुगडे, सै पाटोळे, दैवान जाधव केशव पाटोळे सुरज जाधव मनोहर पाटोळे व रामोशी वाडा येथील गावठाण हद्दीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी अभिजीत माळी यांनी आभार मानले.