Home विदर्भ यवतमाल का राजा सेवा परिवारा तर्फे लहान गरजु व्यापार्‍यांना 26 जानेवारीला छत्रीचे...

यवतमाल का राजा सेवा परिवारा तर्फे लहान गरजु व्यापार्‍यांना 26 जानेवारीला छत्रीचे वाटप

234

यवतमाळ – यवतमाल का राजा सेवा परिवार, नवयुवक गणेश मंडळ यवतमाळने कोरोना संसर्ग महामारी दरम्यान अनेक सेवा प्रकल्प राबवून गरजुंपर्यंत अत्यावश्यक वस्तु, धान्याची किट, मास्क, सॅनिटायझर, पशुंना चारा, पोहचविण्याचे स्तुत्य उपक्रम हाती घेतले हेाते. यावेळी गणतंत्र दिनी 26 जानेवारीला यवतमाल का राजा सेवा परिवारा तर्फेशहरातील लहान गरजु व्यापारी, फळविक्रेते, भाजी विक्रेते, मोची, सायकल रिपेरिंग करणारे तसेच फूटपाथवरील लहान व्यापार्‍यांना आकर्षक छत्री वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील जवळपास 500 लहान गरजु व्यापार्‍यांना यवतमाल का राजा परिवाराच्या वतीने यवतमाळ शहरातील प्रत्येक चौका-चौकात सर्व्हेक्षण करून गरजुंना 26 जानेवारी पासुन मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. कोरेाना संसर्ग दरम्यान लहान व्यापार्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आणि येणार्‍या काळात उन्हाळ्यात लहान व्यापार्‍यांना सुविधा व्हावी याकरीता छत्री वाटपाचा उपक्रम यवतमाल का राजा सेवा परिवाराच्या वतीने राबविण्यता येते आहे. याचा लाभ गरजु लहान व्यापार्‍यांनी घ्यावा असे आवाहन यवतमाल का राजा सेवा परिवाराचे अध्यक्ष मनोज पसारी यांनी केले आहे.