Home महत्वाची बातमी युवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप...

युवा लॉयन्स ग्रुप टीम ने शिकारी कुत्रांच्या हल्ल्यातून वन्यप्राणी नीलगाय रोईला सुखरूप सोडविले

194

मनिष गुडधे

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे जात आहेत वन्यप्राण्यांचे जीव..
जंगली शिकारी कुत्र्यांच्या तावडीत वन्य प्राणी (नीलगाय) रोई सापडला.


अमरावती :-  लोंणटेक गोपगव्हाण ( पुनर्वसन ) गावाच्या शिवारात आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास 25 ते 30 जंगली कुत्र्यांनी (नीलगाय)रोई ला कळपातुन एकटे करून त्यांच्यावर हल्ला चढवला.
भयभीत झालेल्या रोई जिवाच्या आकांताने जंगलातुन गावाच्या दिशेने सैरावैरा पळत सुटला पण कुत्र्यांची संख्या जास्त असल्यामुळे कुत्र्यांनी रोई चा पाठलाग करुन लचके तोडण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात रोई गंभीर जंखमी झाला .
या सर्व प्रकार गोपगव्हाण पुनर्वसन रहिवासी राजेश‌ मस्के , गिरीश मोवाड , इरफान शेख, अमोल पेढेकर ,व सतिश पेढेकर यांनी बघताच त्या शिकारी कुत्र्यांना पळविण्याचा प्रयत्न केला . मात्र शिकारी खुप आक्रमक झाल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली .
त्यांनी लगेच या घटनेची माहिती युवा लॉयन्स ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष मा. योगेश भाऊ गुडधे व जिल्हा संपर्कप्रमुख अमोल भाऊ शिनगारे यांना दिली अवघ्या काही मिनिटांत युवा लॉयन्स ग्रुप चि टिम भातकुली तालुका प्रमुख नईम भाऊ पठाण व अनिकेत कराळे व इतर युवा लॉयन्स ग्रुप चे कार्यकर्ते घटनास्थळावर पोहोचले. सर्व शिकारी कुत्र्यांना पळवून लावून (नीलगाय) रोई ला ताब्यात घेऊन लगेच त्यावर प्रथमोपचार केला. व या घटनेची माहिती वन विभागाला दिली,
वनविभागाची टिम वेळेवर न पोहोचल्यामुळे व त्यांच्या हलगर्जी पणामुळे एका मुक्या वन्य प्राण्याला आपल्या जिवाला मुकावे लागले….