उप प्रादेशिक परिवहन विभागाची गांधीगिरी
शरीफ शेख
रावेर , दि. १६ :- जळगाव एकतिसाव्या रस्ते सुरक्षा अभियान- २०२० अंतर्गत उप प्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव यांचेकडून विना हेल्मेट, विना सिटबेल्ट तसेच वाहन चालवितांना भ्रमणध्वनीचा वापर करणाऱ्या वाहनचालकांसोबत गांधीगिरीचा अवलंब केला. नियम तोडणाऱ्या वाहन चालकांना त्यांच्याकडून पुन्हा अशाप्रकारे नियमांचा भंग होवू नये, यासाठी त्यांना गुलाबपुष्प देवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आलेल्या वाहन चालकांना पुन्हा अशाप्रकारे वाहन चालवू नका अशी गांधीगिरी स्वरुपातील विनंतीही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली.
या कार्यक्रमासाठी पगारिया ॲटो, जळगाव यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, कर वसुली अधिकारी सी. एस. इंगळे, सहाय्यक मोटार निरीक्षक निलेश झाडे, श्रीमती श्वेता पाटील, श्रीमती श्रध्दा माळी, एस. पी. सानप, श्रीमती मालोदे, श्रीमती देहाडे, श्रीमती मराठे आदि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.