योगेश कांबळे
वर्धा – जिल्ह्यातील हिंगणघाट येथील संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी अतुल महादेवराव देवढे यांची मारोती स्विफ्ट कार अज्ञात चोरट्यानी लंपास केल्याची घटना दि.21 रोजी सकाळी उघड़किस आली.
कारमालक अतुल देवढे यांनी घरचे सीसी टीवी तपासले असता दोन इसम कार चोरतांना आढळले असून पोलिसांना मात्र आरोपी शोधन्यात अद्यापपावेतो यश आले नाही.
कारमालक शिक्षक म्हणून नोकरी करीत असून गेल्या संत तुकडोजी वार्ड येथील तांबुलकर ले-आऊट येथे कुटुंबासह राहतात,त्यांनी पांढऱ्या रंगाची मारोती स्विफ्ट
डिजायर कार क्रमांक एम एच- 32 वाय 2970 आहे हि गाडी मी सेवा मारोती शोरून वर्धा येथुन 2015 ला सुमारे 8 लाख 16 हजार रुपये किंमतीला खरेदी केली होती.
दि.21 रोजी सकाळी देवढे कुटुंबिय जागे होताच कार दिसली नाही म्हणून त्यांनी आपले घराचे सी.सी.टी.व्ही फुटेज बघीतले,त्यात पहाटेच्यावेळी त्यांना दोनअनोळखी इसमांनी स्वीफ्ट गाडी लांबविल्याचे लक्षात आले.सदर कारमधे गाडीचे मुळ कागदपत्रे,तसेच शिक्षक देवढे यांचे पत्नीची वैद्यकीय उपचाराची फ़ाइल तसेच शाळेसंबंधी महत्वाची कागदपत्रेसुद्धा गाडीतच असल्याने चोरी गेली आहेत.
श्री देवढे यांनी घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसांत नोंद केली. फिर्यादिचे तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार संपत चव्हाण हे करीत आहेत.