घाटंजी तहसील कार्यालयात तहसीलदार पुजा माटोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण..!
अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील घाटंजी, पारवा, कुर्ली आदी ठिकाणी मोठ्या उत्साहात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. घाटंजी तहसील कार्यालयात तहसीलदार पुजा माटोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. घाटंजी नगर परिषदेत नगराध्यक्ष सौ. नैना शैलेश ठाकुर, घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस उपनिरीक्षक कीशोर भुजाडे यांच्या हस्ते, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात सभापती व पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे, गिलाणी कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एम. ए. शहेजाद, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात उप विभागीय अभियंता विनायक ठाकरे, पारवा येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अर्चनाताई करपते, बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात आबासाहेब पारवेकर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिन देशमुख पारवेकर, पारवा येथील आबासाहेब पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्थेत उपाध्यक्ष नानाजी मुद्देलवार, सचिव श्री. ईसपाडे, पारवा पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरख चौधर, प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्या पावतीताई रुपेश कल्यमवार, कुर्ली येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक तथा केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय ठाकरे, केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद किसन शिरपुरकर, बाबासाहेब देशमुख विद्यालयात मुख्याध्यापक महेश बोदुलवार आदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ठिकठिकाण च्या कार्यक्रमात घाटंजी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शैलेश ठाकुर, निवासी नायब तहसीलदार डि. एम. राठोड, निवडणूक नायब तहसीलदार आर. डी. मेंढे, घाटंजीचे पोलीस उपनिरीक्षक कीशोर भुजाडे, नाझर श्री. नवले, प्रा. प्रशांत उगले, घाटंजी पंचायत समितीचे उपसभापती सुहास देशमुख पारवेकर, घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रुपेश कल्यमवार, घाटंजी तालुका भाजपा सरचिटणीस जिवन मुद्देलवार, उपसरपंच श्री. आत्राम, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य संजय आरेवार, कुर्ली ग्रामपंचायतचे ग्रामसचिव विजय उडाखे, मंडळ अधिकारी विजय मेश्राम, तलाठी भारत लढे, शिक्षक दिपक महाकुलकर, किसन किणाके सर, नितीन मुद्देलवार, ग्रामपंचायत सदस्य सतिष गड्डमवार, मीराबाई किणाके, जोत्स्ना आकाश आत्राम, फुलचंद जाधव, संजय आत्राम, रमेश अंगावार, सुनिल भालशंकर, स्वामी काटपेल्लीवार, महंमद मोसीन, डॉ. गोविंद येरावार, आकाश आत्राम ईत्यादी उपस्थित होते. विशेष म्हणजे काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, हे येथे उल्लेखनीय.