घाटंजी / यवतमाळ – (तालुका प्रतिनिधी ) – अख्ख्या जगात थैमान घातलेलेल्या कोरोना महामारिने सर्व कामकाज विस्कळीत झाले असतानाच घाटंजी तालुक्यात कोरोना काळात उत्कृष्ट कार्य बजावून कोरोनावर नियंत्रण मिळविले.
तर या काळातील मुदत संपलेल्या ग्राम पंचायत निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्या तरी त्या नियोजनबद्ध रित्या घेवून पारदर्शकता राबविल्याने तालुक्यातील सेतू चालक संघटनेने २६ जानेवारीचे औचित्य साधून तहसिलदार पूजा माटोडे यांचा सत्कार करण्यात आला.
एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या ग्राम पंचायततिच्या निवडणुका कोरोणाच्या संक्रमनामुळे त्या पुढे ढगलण्यात आल्या होत्या. त्यातच या काळातील सर्व टप्प्यांतील ग्राम पंचायतीच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात आल्याने अधिकारी व कर्मचारी यांना मोठी कसरत करावी लागली. यातच आदिवासी बहुल व दुर्गम भागात वसलेल्या तालुक्यात ५० ग्राम पंचायतिची निवडणूक होऊ घातली होती. यात केवळ सावंगी संगम एकमेव ग्राम पंचायत अविरोध होती. या ठिकाणी महिला तहसिलदार असताना सुध्दा त्यांनी अथक परिश्रम घेवून आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक प्रक्रिया कुठेच गालबोट न लागू देता सर्व कार्यालयीन कामकाज सुरळीत सांभाळून पार पाडली. या शिवाय या निवडणुकीत बहुतांश महिला कर्मचारी वर्गाचा समावेश असताना सुध्दा त्यांना सुरक्षित नियमावली लावून कार्य करून घेतले निवडणूक प्रशिक्षणापासून तर शेवट निकाल जाहीर होईपर्यंत स्वतः अहोरात्र झटत उत्कृष्ट कार्य निभावत काही तासात उमेदवाराच्या हातात निकाल दिला. या बाबिने तालुका वासियात समाधान व्यक्त होत आहे. हिच बाब हेरून महिला अधिकारी असताना एवढे स्तुत्य कार्य बघून अश्या अधिकाऱ्यांचा कुठे तरी सन्मान व्हावा या उद्देशातून तालुक्यातील सेतू चालक संघटनेकडून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार पूजा माटोडे यांचा २६ जानेवारी ला सत्कार करण्यात आला. याक्षणी निवासी नायब तहसिलदार दिलीप राठोड, नायब तहसिलदार निवडणूक रमेश मेंढे, संजय होटे, गेडाम, मंडळ अधिकारी, तलाठी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. या उपक्रमाने अधिकारी कर्मचारी वर्गात आनंद संचारला होता.
यावेळी सेतू चालक संघटनेचे धनराज पवार, राहुल जीवने, रमेश सायरे, गजानन पालेवार, संदीप जाधव मुद्रांक विक्रेते दत्तात्रय पोटपिल्लेवार उपस्थित होते.