कुंभार पिंपळगाव येथील ढाण्या वाघ गेल्याने पसरली शोककळा
घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील तेली समाजातील जेष्ठ नागरिक विष्णूपंत पाखरे यांचा मुलगा मोहन ,वय वर्षे ४५ यांचे काल सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आकस्मिक निधन झाले . त्यांच्या पश्चात वडील, पत्नी,मुलं, भाऊ,भावजयी असे कुटुंब आहे.पाखरे कुटुंब कुंभार पिंपळगाव येथील मुळ रहिवासी आहेत.काही वर्षांपासून ते जालना शहरात वास्तव्यास होते.मेहनती आणि धडपडी स्वभावामुळे पाखरे बंधूंनी शुन्यातून विश्व निर्माण केले होते.मोहन पाखरे यांच्या निधनाने जालना शहरासह कुंभार पिंपळगाव येथील व्यापारी,समाज बांधव आणि सर्व ग्रामस्थांना धक्का बसला आहे.ऐन तारूण्यात, उमेदीच्या काळात मोहन ने जगाचा निरोप घेतल्याने गाव परिसरात शोककळा पसरली आहे.कुंभार पिंपळगाव येथील शिवाजी आणि संभाजी राऊत यांचे ते मेहूणे होत.