Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्यात यंदा लेकीबाळींची रसाळी जोमात होण्याचे निसर्गाचे संकेत

यवतमाळ जिल्ह्यात यंदा लेकीबाळींची रसाळी जोमात होण्याचे निसर्गाचे संकेत

260

शेवळी सयद्या साख-या तेल्या केळ्या दहीहांड्या

खोब-या नामक आम्रवृक्ष मोहोरले

मामाच्या गावाला जाऊया……

देवानंद जाधव

यवतमाळ –  निसर्गाला वसंतॠतुचे डोहाळे लागले असतानाच, ऋतुराज अवतरलाय. जिल्ह्यातील रानाशिवारात आंब्याच्या मंतरलेल्या मोहोरांनी अवघे आसमंत दरवळुन गेले आहे.


वळणावरच्या वयात हात पिवळे करून, सासरी गेलेल्या लाडाच्या लेकीला, जणु माहेरची रसाळी खुणावत असते. किंबहुना तिला आपसुकच रसाळीचे वेध लागलेले असतात.
ऊन्हाळा म्हणजे तोंडाला पाणी सोडणा-या कैरीचे दिवस, शिमग्या नंतर कैरीचे बाजारात आगमन होते. त्या नंतर घराघरांत आंब्याच्या रसाची धम्माल सुरू होत असते. या वर्षी पंचक्रोशीतील आम्रवृक्ष मोठ्या प्रमाणात
मोहोरलेले दिसत असल्याने, यंदा लेकीबाळींची रसाळी जोमात होण्याचे निसर्गाचे संकेत आहे. या हंगामात ऐन वेळेवर आभाळातील ढगं बुजाडल्याने आणि नानाविध रोगांनी पिकांना कवेत घेतल्याने, भूमिपुत्रांनी डोळ्यात साठवून ठेवलेले *सुगी* चे स्वप्न दिवास्वप्न ठरलीत. स्वप्नांच्या भावविश्वात सुखी संपन्नतेच्या हिंदोळ्यावर झोके घेणा-या ,तमाम भूमिपुत्रांच्या जिंदगानीच्या हिंदोळ्याची *च-हाड* पुरती घासुन गेली, हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करुन, काळ्या मातीतून मोती पिकवणा-या शेतकर्यांना या वर्षी माती खायची पाळी आली आहे. घामाने गदगद झालेल्या शेतक-यांच्या कपाळावरील सातबा-यावर *सटवी* ने आजीवन दुःखाची नोंद केली की काय?अशी काळीज कुरतुडुन नेणारी शंका, मानवी मेंदूला डागण्या देत आहे. त्यामुळे अवघा अन्नदात्यांचा मराठी मुलूख अगदी अस्वस्थ झाला आहे
पावसाचे पाणी ऊरावर घेत, चिखल तुडवत,फाटलेल्या धोतराच्या फडक्यात शिळ्या भाकरीवर चटनीचा गोळा असलेली,
*शिदोरी* घेऊन दररोज वावराची वाट धरायचा. पण यंदा निसर्गाने शेतक-यांचीच *वाट* लावली. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी निसर्गाचा प्रकोप भूमिपुत्रांनी हताशपणे
” याची देही, याची डोळा “
बघीतलाय. अंधारात उंदीर पकडणार्या मांजराच्या औलादीच्या बोगस बियाणे कंपन्यांनी लुटले, निसर्गाने मारले ,कृमी किटकांनी खाल्ले, असे म्हणत कपाळावर हात मारून घेतले. बायकोच्या खांद्यावर डोकं ठेऊन अश्रू ढाळत, मनात ओथंबलेल्या भाव भावनांचा कोंडमारा दुर सारत, एकमेकांना धिर देत आहेत.
सरकारच्या सासुरवासाने आणि सततच्या नापिकीने कर्जाच्या ओझ्याखाली आलेल्या शेतक-याची अवस्था यंदा अर्धवट ठेचलेल्या सापासारखी झाली आहे. चौफेर संकटाच्या अग्नीपरिक्षेत
*नापास* ठरलेल्या जगाच्या अनेक मायबाप पोशिंद्यांनी, आपल्याच जीवाच्या दिव्याची *वात*
आपलाच हाताने कुस्करून या जगाचा निरोप घेण्याच्या दुःखदायी, वेदनादायी पर्वाचा प्रारंभ केला. आजही भूमिपुत्रांच्या मृत्यूचा आलेख गगनाला गवसनी घालतो आहे.
साता जन्माच्या गाठी बांधुन ,जन्मो जन्मी साथ देण्याची शपथ घेणारा
*घरधनी* परलोक प्रवासाला निघुन जात आहे. दुधाचे ओठही न सुकलेल्या चिमण्या पाखरांना वा-यावर सोडुन बळीराजा मृत्यूला कवटाळत स्मशानभूमी जवळ करत आहेत.
अर्ध्या वरती डाव मोडून ,बायकोचं *कुंकू*
पुसण्याची दुदैवी मालिका अद्यापही सुरू असल्याचे जिल्ह्यात दिसते आहे.
कपाळावरील करपलेलं कुंकू पदराने पुसत, माय माऊली संसाराची खिंड एकाकी लढवित आहेत.
घरधन्याने साथ सोडल्यानंतर, संसाराची एका चाकाची बैलगाडी ओढुन ओढुन, रक्ताळलेल्या खांद्यावर एकांगी *भार* ऊचलला.
लाडाच्या लेकीचे हात पिवळे केले. आजही बापाच्या हातुन *कन्यादान*
होण्याचं भाग्य असंख्य बहीणीच्या नशीबी नाही आहे. अशा या वेदनादायी अवस्थेत, जिल्ह्यातील शेवळी, सयद्या, साख-या,तेल्या, केळ्या, दहीहांड्या, लाडु, अशी डझनावर नामांकित गावरान आंब्याची झाडं मोहोरांनी लदबदुन गेली आहेत. लेकीबाळींच्या जीवनात सुगंधाची कस्तुरी पेरणारा, आणि तोंडाला पाणी सोडणारा गावरान आंब्याचा मोहोर लाडाच्या लेकीला, माहेरी रसाळीला येण्याचा जणु *सांगावा* च धाडत असतो.
माञ या वर्षीचा सुगीचा ईतिहास बघता, आणि निसर्गाचे फिरणारे ऊलटे चक्र बघता, त्या मोहोराचे आंब्यामध्ये रुपांतर होईल की नाही, हे अगदी पारंगत पंडीतालाही सांगता येणार नाही. निसर्ग राजा आंब्याच्या झाडावर आलेल्या मोहोरावर जर कोपला नाही, तर लेकीबाळींची रसाळी जोमात होणार, हे अगदी सुर्यप्रकाशाईतके सत्य आहे. तथापि लेकरां बाळांच्या पोटासाठी आयुष्यभर कष्ट ऊपसता ऊपसता काळाच्या पडद्याआड झालेल्या ,बापाच्या पाउलखुणांना, डबडबलेल्या डोळ्यांनी, भिंतीवरील फोटोला ऊदबत्ती लावताना, किंबहुना *घास*
भरविताना माञ त्या रसाळीला *आंबटपणा*
येईलच येईल एवढे नक्की. सबंधीत
तुर्तास आंब्याच्या झाडावर चा लदबदलेला मोहोर बघता.,यंदा रसाळी जोमात होण्याचे निसर्गाचे संकेत आहेत……
चला…तर..मग…
*मामाच्या गावाला जाऊया*…..