विनोद महाजन
वर्धा – जिल्ह्याची ची छोटी दंगल फ्रेम व जूनियर मिल्खा नावाने प्रसिद्ध असलेली तीन वर्षाची आर्या दत्तपुर , अमरावती क्रोस कंट्री स्पर्धेतील सर्वात लहान व आकर्षक स्पर्धक पुलंगाव येथील पोलीस कर्मचारी पंकज टाकोने यांच्या छोट्याशा कुटुंबात मेहनती,व जिद्ध, चिकाटी असलेली त्यांची तीन वर्षीय आर्या नावाच्या मुलीने सर्वात कमी वयात व लहान स्पर्धक तसेच स्पर्धेतील आकर्षक स्पर्धक म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर अमरावती ग्रीन रन, क्रोस कंट्री स्पर्धेतील सर्वात लहान स्पर्धक व आकर्षक स्पर्धक म्हणून मान मिळवला आहे.
आर्या ही अवघ्या तीन वर्षांच्या वयात सीटअप्स, डिप्स, पुलउप्स तसेच दररोज चार किलोमीटर धावण्याचा सराव करीत असते दिवसातून तीन वेळा आर्या सराव करीत असते, व असे ती वयाच्या अवघ्या दोन वर्षापासून करीत आहे .
वडील पोलीस कर्मचारी असुन ते स्वतः वॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू असल्याने रोज स्वतः व्यायाम व कसरत करीत असल्याने आर्या चे लक्ष वडिलांच्याकडे केंद्रित होत जाऊन आर्या ही वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत आज तिने सगड्यांच्या नजरा आकर्षित करीत अनेक बक्षिसे पटकाविले आहे. आर्या ची आई स्नेहा पंकज टाकोणे व वडील पंकज टाकोणे यांनी खूप परीश्रम घेत पुढे आर्या जागतिक विश्वविक्रम करून गिनीज बुक ऑफ वल्ड रिकॉर्ड मधे नाव नोंदविल व आलंपिक स्पर्धेत आर्या भाग घेवून भारताचे नाव उच्च स्तरावर पोहचवेल असा निश्चय केला आहे. व त्यासाठी आपल्या तीन वर्षीय मुलिकड़ूँन कठोर परिश्रम घेत आहे.