Home मराठवाडा महिला सरपंचांनी साडी खरेदी मध्ये बचत करून सुकन्या समृध्दी खाते पुस्तकाचे वाण...

महिला सरपंचांनी साडी खरेदी मध्ये बचत करून सुकन्या समृध्दी खाते पुस्तकाचे वाण केले – एस. टी. सिंगेवार

293

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. १७ :- मु.पो.सारखणी तालुका किनवट येथील आदिवासी महिला सरपंचांनी मकरसंक्रांतीला सर्व महिला मोठ्या किमतीचा साडी खरेदी करीत असताना पण सरपंच सो. वनमाला तोडसाम यांनी स्वताच्या साडी खरेदी व त्यांच्या मुलीच्या मकरसंक्रांत कपडे खरेदी मध्ये बचत करून गावातील १४ गरीब शून्य ते दहा वर्षा पर्येंतच्या मुलींच्या नावे डाक विभागाची योजना मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते उघडुन मुलींच्या आईला मकरसंक्रांत वाण म्हणून सुकन्या समृध्दी खाते पुस्तक, उसाचे,पेरू,बोरे हरभरा झाडाचे फळे ताटात सर्व पूजेचे साहित्य हाळदी कुंकू ठेऊन १४ मुलींच्या आईला वाण ओटीत देऊन महिला सरपंच डिजिटल न्यु इंडिया वाण देण्याची सुरुवात राज्यात नाही तर देशात यांची सुरुवात होत आहे.

सरपंच म्हणाले की देशातील दानशूर व्यक्ती महिला खर्चा बचत करून यांनी वर्षाला फक्त कमीत कमी दोन किंवा पाच गल्लीतील किंवा गावातील गरीब मुलीला आशा प्रकारे कोणत्याही सणा निमित्ताने मुलीच्या नावे भेट दिल्यास येणाऱ्या पिढीतील मुली लग्नापासून व शिक्षणापासून वंचित रहाणार नाहीत अशी मुलाखती मध्ये महिला सरपंच यांनी सांगितले.
सुकन्या समृध्दी खाते योजना ही भारत सरकारची योजना आहे भारतीय डाक विभाग मार्फत या योजनेचा लाभ मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी,व मुलींच्या उजवल भविष्यासाठी आहे.या योजनेत फक्त पंधरा वर्षे पैसे भरणे आवश्यक आहे आपल्या बचत खात्या प्रमाणे पैसे जमा करावे लागेल एका आर्थिक वर्षात पैसे जमा होतात त्या पैशावर ८.४ चक्रवाढ व्याज दिला जातो. हे व्याज एकवीस वर्ष दिला जातो.ज्या ज्या वर्षात सरकार व्याज बदल केला जाईल त्या त्या प्रमाणे व्याज जमा होईल.
हे पैसे उचलण्याचा फक्त मुलीलाच आहे.
मुलगी आठरा वर्ष पूर्ण झाल्याने ५०% रक्कम उचलू शकते.