आंतकवाद्यांना मदत करणारा पोलीस उपअधीक्षक देवेंद्रसिंग च्या प्रतिमेचे दहन ला पोलिसांचा विरोध
उपोषणार्थी मधे संतापाची लाट….!
शरीफ शेख
रावेर , दि. १७ :- जळगाव मुस्लिम मंच द्वारा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर सुरु असलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून साखळी उपोषणाचा गुरुवार तेविसावा दिवस बागवान बिरादरी च्या सक्रिय सहभागाने विरोध नोंदवन्यात आला.
उपोषणाची सुरवात फारुक शेख यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर सांगता सलीम खान यांच्या दुवा ने करण्यात आली.
आंतक वाद्यांना मदत करणारा पोलीस उपअधीक्षक देवेंद्रसिंग चा निषेध
जम्मू-काश्मीरमध्ये पोलिस उपअधिक्षक म्हणून कार्यरत असलेला देवेंद्र सिंग यांचे आतंकवाद या सोबत असलेले संबंध व अंतक वाद्यांना करीत असलेल्या मदती बाबत उपोषणस्थळी फारुक शेख यांनी त्याची माहिती वाचून दाखवली असता त्याचा त्रीव धिक्कार करण्यात आला व त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून त्याच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार होते परंतु जिल्हापेठ पोलिसांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करू न दिल्याने तो कार्यक्रम स्थगित करण्यात आला परंतु आमच्या लोकशाही मार्गाने अतिरेकयाचे निषेध सुद्धा करता येत नसल्या बद्दल फारूक शेख व त्यांच्या सहकार्यनि खंत व्यक्त कली.
*शुक्रवारी शहरातील महिला व पुरुषांचे धरणे आंदोलन*
संपूर्ण जिल्हाभरात शुक्रवार १७ जानेवारी रोजी दुपारी तीन ते पाच दरम्यान तालुक्यात तहसील समोर तर जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येणार असून सदर धरणे आंदोलनात जास्तीत जास्त पुरुष व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन संविधान बचाव कृती समितीतर्फे प्रतिभा शिंदे यांनी केलेले आहे.
*उपोषणस्थळी यांची होती उपस्थीती*
बागवान बिरादरीचे साखळी उपोषण गुलाब रफिक बागवान यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून या उपोषणाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व बागवान बिरादरी च्या हातगाडी वर फ्रूट विकणार यांनी आपला व्यवसाय बंद करून यात सहभाग नोंदविला त्यात प्रामुख्याने मुस्ताक रहमान ,अतिक शब्बीर, इरफान इलियास ,शाहरुख निसार, हाजी मोहम्मद रफीक, इस्माईल रसूल, जावेद हमीद, जाकिर रहिम, शरीफ याकुब, रिजवान बागवान, इरफान इस्माईल, मुस्तकीम बागवान ,जुनेद बागवान, रिजवान बागवान, युसुफ आमिर, अनिस बागवान, जाकीर बिस्मिल्ला, आदींचा समावेश होता.
*निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन*
गुलाब बागवान यांच्या नेतृत्वास ज़िया करीम ,अतीकशब्बीर शफी, अमीर ,मुस्ताक रहमान, डॉक्टर रियाज गुलाब, मोहसीन शब्बीर, निसार रज्जक ,रफिक इब्राहिम, यांनी निवासी उपजिल्हाधिकारी कदम साहेब यांना निवेदन दिले
*मुस्लिम मंच तर्फे आवाहन*
शुक्रवारी होणाऱ्या धरणे आंदोलनात जळगाव शहरातील सर्व समाजातील महिला व पुरुषांनी दुपारी तीन वाजेच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात बाहेर एकत्रित व्हावे व दोन तास नागरिकत्व कायद्याला विरोध करावा असे आवाहन मुस्लिम मंच तर्फे करण्यात आलेले आहे.