Home विदर्भ घाटंजी येथे तहसीलदार, नायब तहसीलदारासह कर्मचाऱ्यांचा सत्कार

घाटंजी येथे तहसीलदार, नायब तहसीलदारासह कर्मचाऱ्यांचा सत्कार

239

घाटंजी तालुका पत्रकार संघटनेचा पुढाकार

यवतमाळ / घाटंजी-(तालुका प्रतिनिधी) एप्रिल ते डिसेंबर २०२० दरम्यान मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीच्या दोन्ही टप्प्यातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात घाटंजी तालुक्यातील ५० ग्राम पंचायतीचा समावेश होता. येथिल ग्राम पंचायतिच्या निवडणुका तहसीलदार पुजा मातोडे व नायब तहसीलदार यांच्या पारदर्शक नियोजनाने कोरोना काळात सर्व नियम बाळगून उत्कृष्टरित्या पार पडल्या. कोरोनावरही उत्कृष्ट कार्य केले .

अश्या अधिकाऱ्यांचा व त्यांच्या कर्मचाऱ्यांचा कुठे तरी सन्मान व्हावा त्यांच्या कार्यात स्फूर्ती मिळावी हा उदांत उद्देश पुढे ठेवून घाटंजी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदार पूजा मातोडे, निवासी नायब तहसीलदार दिलीप राठोड, नायब तहसीलदार होटे साहेब, गेडाम मॅडम, तथा निवडणूक विभागाचे वरिष्ठ लिपिक मानवटकर, चालक गिरी यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्य केले की, त्याचे मूल्यमापन आले मात्र अख्ख्या जगात थैमान घालणाऱ्या कोरोना काळात जिवाभावाने कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी काय जीवाचे रान केले हे बहुतांश पुढे आलेले नाही. घाटंजी तालुक्यात महिला तहसीलदार असताना सुध्दा आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केले. त्यांच्या पुढे अनेक समस्या निर्माण झाल्या तरी त्यांनी प्रत्येक समस्येवर मात करीत तालुक्याच्या जबाबदार अधिकारी म्हणून आपले कार्य चालू ठेवले. यातच लांबणीवर टाकण्यात आलेल्या दोन्ही टप्प्यातील ग्राम पंचायत निवडणुका एकाच वेळी घेण्यात मोठी कसरत होती. तरी सुद्धा स्वतः या निवडणूक कार्यात स्वतः कष्ट घेवून पारदर्शक रित्या पार पाडून१८ जानेवारीला काही तासात उमेदवाराच्या हातात निकाल दिला गेल्याने तालुक्याच्या जनतेत आनंद संचारला. एवढेच नाही तर प्रथमतःच मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी वर्गाचा समावेश या निवडणुकीत होता. त्यावरही महिलेच्या सुरक्षेसाठी एक नियमावली तयार करून त्यांचे कडून सुध्दा कार्य करून घेतले. या सर्व कार्याची दखल म्हणून अश्या अधिकारी व कर्मचारी यांचा कुठेतरी सन्मान व्हावा या उद्देशातून घाटंजी तालुका पत्रकार संघटनेने पुढाकार घेऊन हा सत्कार सोहळा आयोजीत केला होता. सर्व प्रथम तहसीलदार मातोडे यांचा सत्कार जेष्ठ पत्रकार चंद्रकांत ढवळे, सुधाकर अक्कलवार, पत्रकार संघटनेचे सचिव महेंद्र देवतळे यांच्या सहचारिणी मनीषा देवतळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दै. लोकमत चे ज्येष्ठ पत्रकार सुधाकर अक्कलवार यांचे कडून झाशी ची राणी लक्ष्मी बाई यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळेस सत्कार मूर्ती तहसीलदार मातोडे यांनी पत्रकार संघटनेने आम्ही केलेल्या कामाची दखल घेतल्याने सर्व पत्रकार बांधवांचे आभार आपल्या मनोगतातून मानले. याक्षणी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजू चव्हाण, उपाध्यक्ष आकाश बुरेवार, सचिव महेंद्र देवतळे, कोषाध्यक्ष सागर सम्मनवार, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत ढवळे, सुधाकर अक्कलवार, पांडुरंग निवल, दिनेश गाऊत्रे, संतोष पोटपिल्लेवार, अरुण कांबळे, मुकेश चिव्हाने, संजय ढवळे, प्रेमदास चव्हाण, सैय्यद जावेद, कुणाल तांगडे, योगेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते गणेश मुद्दलवार, राजु नीकोडे, विनोद प्रधान, सुभाष आडे हे होते. सूत्रसंचालन महेंद्र देवतळे यांनी केले तर आभार आकाश बुरेवार यांनी मानले.