⚫ आर्णी विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक..!
अयनुद्दीन सोलंकी,
घाटंजी / यवतमाळ – राज्याचे जलसंपदा मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा ५ फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी २.१५ वाजता आर्णी येथे दौरा आयोजित करण्यात आला आहे.
या दौऱ्याचा कार्यक्रम असा, आर्णी विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक तसेच राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून, सदरच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. सदरचा कार्यक्रम हा यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य ख्वाजा बेग यांचे निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे.
◼️ आर्णी व ईतर तालुक्यातील व शहरातील सर्व मान्यवर, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुका व शहर कार्यकारणीतील सदस्य, महिला, युवक, युवती, विद्यार्थी तसेच ईतर सर्व राष्ट्रवादी सेलचे तालुका पदाधिकारी व त्यांचे सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व बुथ अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी या आढावा बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आर्णी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष हरीश कुडे, आर्णी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र शिवरामवार यांनी केले आहे.