Home विदर्भ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील...

राज्याचे जलसंपदा मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा ५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी परिवार संवाद निमीत्त यवतमाळ जिल्हा दौरा.

413

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – राज्याचे जलसंपदा मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा ५ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. जयंतराव पाटील यांचा नियोजित दौरा खालील प्रमाणे,


👉🏿 सकाळी १० वाजता :
यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी बैठक, स्थळ: समर्थ प्राईड हॉल,
नागपूर बायपास, आर्णी रोड, यवतमाळ
सकाळी ११.१५ वाजता :
यवतमाळ विधानसभा आढावा बैठक
दुपारी १२.३० वाजता :
राळेगाव विधानसभा आढावा बैठक, स्थळ : माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे निवास स्थान, यवतमाळ
👉🏿 दुपारी २.१५ वाजता :
आर्णी विधानसभा आढावा बैठक
स्थळ : माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांचे निवासस्थान, आर्णी
दुपारी ३.०० वाजता :
दिग्रस विधानसभा आढावा बैठक
स्थळ : माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांचे निवासस्थान, आर्णी
👉🏿 सायंकाळी ५ वाजता :
राष्ट्रवादी परिवार संवाद सभा
स्थळ : बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेज ऑडिटोरियम, पुसद
आयोजक: मा. आमदार श्री. ईंद्रनील नाईक, पुसद
सायंकाळी ६.४५ वाजता :
उमरखेड विधानसभा आढावा बैठक
सायंकाळी ७.३० वाजता :
पुसद विधानसभा आढावा बैठक
स्थळ : इंजिनिअरिंग कॉलेज लायब्ररी हॉल, पुसद ईत्यादी ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
⚫ जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीला विशेष निमंत्रित, सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विधानसभा अध्यक्ष, फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष यांनी वेळेवर उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकां कडून करण्यात आली आहे. वरील सर्व कार्यक्रमांना विधानसभा निहाय मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार (माजी विधान परिषद सदस्य) तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांनी केले आहे.