रावेर (शरीफ शेख )
जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहरात नगरोत्थान निधी अंतर्गत विविध ठिकाणी हाय मोस्ट लॅम्प लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नईम खान बागवान यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
नगरपंचायत हद्दीतील ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, मुस्लिम कब्रस्तान, जिजाऊ बालोद्यान, रेणुका माता मंदिर, समशान भूमी, बस स्थानक या ठिकाणी रात्रीच्या वेळी अत्यंत अंधार पसरलेला असतो. म्हणून वरील सर्व ठिकाणी नगरोत्थान निधी अंतर्गत हाय मोस्ट लॅम्प बसवून निधी भरून काढावा अशा मागणीचे निवेदन मुख्याधिकारी नगरपंचायत बोदवड यांना नवीन खान बागवान यांनी दिले….