Home महत्वाची बातमी पोलिसांना महिलेची रात्री चौकशी करणे पडले महागात

पोलिसांना महिलेची रात्री चौकशी करणे पडले महागात

668

अमीन शाह 

अमरावती पोलिसांना महिलेची रात्री उशीरा पोलिस स्टेशनमध्ये चौकशी करणे महागात पडले आहे . हे प्रकरण 11 वर्षांपूर्वीचे आहे , पण राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ( NHRC ) ने अमरावती पोलिसांवर एक लाख रुपयांचा दंड लावला आहे . नियमानुसार , कोणत्याही महिलेची सुर्यास्तानंतर पोलिस स्टेशनमध्ये चौकशी केली जाऊ शकत नाही . मिळालेल्या माहितीनुसार , 11 वर्षांपूर्वी 21 मार्च 2011 मध्ये एका केसदरम्यान पीडित कंचनमाला गावंडे यांना त्यांच्या पतीच्या अटकेनंतर अमरावती पोलिसांनी दोन मुलींसह रात्री पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावले होते . यादरम्यान त्यांना पोलिसांनी धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले . पीडित कंचनमाला गावंडे यांनी याप्रकरणी महा ह्यूमन राइट कमीशनमध्ये तत्कालीन पोलिस कमिशनर अमितेश कुमार आणि शहर पोलिस स्टेशनचे अधिक्षक शिवाजी बचते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती . या तक्रारीवर कारवाई करत आयोगाने त्यांच्यावर एक लाख रुपयांचा दंड लावला . अमितेश कुमार सध्या नागपूरचे पोलिस कमिशनर आहेत .